व्यायाम करायला वेळ मिळत नाहीये, तर या ५ टिप्स फॉलो करून रहा तंदुरुस्त
वजन कमी करण्यासाठी अनेकजण घरगुती उपाय करून व्यायाम करत असतात. पण तुम्हाला माहित आहे का? व्यायाम न करताही तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. यासाठी तुम्ही या सोप्या टिप्स फॉलो करा.

आपल्या पैकी अनेकजण फिट राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी जिमला जातात. इतकंच नाही तर काहीजण हेवी वर्कआऊटसोबतच डायटिंगही फॉलो करतात. पण तुमची रोजची जीवनशैली खराब असेल. तसेच फास्ट फूडचे जास्त सेवन करत असाल तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी फिट राहता येणार नाही. यासाठी तुमच्या रोजच्या खाण्याच्या सवयींकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
पण तुम्हाला माहित आहे का फिट राहण्यासाठी नेहमी व्यायामाची गरज नसते. यासाठी तुम्ही नियमितपणे सक्रिय राहून आरोग्यामध्ये सुधारणा करू शकता जेणेकरून तुम्ही वजन कमी करू शकता. पण तुम्हाला व्यायाम करायचा नसला तरीही काही सोप्या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही फिट राहू शकता. आम्ही आज या लेखात वजन कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स बद्दल सांगणार आहोत. ज्याचा अवलंब करू शकता.
संतुलित आहारावर भर द्या
तंदुरुस्त राहण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निरोगी आहार घेणे. तुमच्या रोजच्या आहारात प्रथिने, कर्बोदके, हेल्दी फॅट, जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेल्या गोष्टींचा समावेश करा. ताजी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य नियमित सेवन करा.
पाण्याचे पुरेसे सेवन
स्वतःला शक्य तितके हायड्रेटेड ठेवा. पाणी शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. तसेच पाण्याचे प्रमाण योग्य राहिल्यास पचन क्रिया चांगली राहते आणि त्वचा हायड्रेट ठेवते. दररोज 8-10 ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
स्वतःला सक्रिय ठेवा
व्यायाम न करताही तुम्ही स्वतःला सक्रिय ठेवू शकता जसे की घरातील साफसफाई करणे या हलक्या शारीरिक हालचाली करत रहा. यामुळे तुमच्या कॅलरीज बर्न होतात आणि तुमचे स्नायू मजबूत होतात.
योग आणि ध्यान
मानसिक-शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी योग आणि ध्यान हे देखील चांगले मार्ग आहेत. योगाद्वारे तुम्ही लवचिकता वाढवू शकता, तणाव कमी करू शकता आणि मानसिक शांती मिळवू शकता. हे एकंदर आरोग्यासाठी चांगले आहे. ज्याने तुमचे वजन कमी होऊ शकते.
तुमची झोप पूर्ण करा
शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी पुरेशी झोप खूप महत्त्वाची आहे. ७-८ तासांची झोप केवळ शरीराला स्वास्थ सुधारत नाही तर तुमची चयापचय क्रियाही सुधारते. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. झोपेची कमतरता रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करते आणि शारीरिक थकवा देखील वाढवते. यासाठी पर्याप्त झोप घ्या.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)