AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कान दुखतोय ? इन्फेक्शनही झालंय ? हळदीचा वापर करून असा दूर करा तुमचा त्रास …

How To Use Turmeric For Ear Infection : हळदीतील दाहक-विरोधी गुणधर्म तुमच्या कानाचा संसर्ग बरा करण्यासाठी उपयुक्त आहेत. हळदीचा वापर कसा करावा ते जाणून घेऊया.

कान दुखतोय ? इन्फेक्शनही झालंय ? हळदीचा वापर करून असा दूर करा तुमचा त्रास ...
Image Credit source: freepik
| Updated on: Apr 29, 2023 | 2:58 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय जेवणात हळदीचा (Turmeric ) वापर वर्षानुवर्षे केला जात आहे. याच्या वापराने अनेक रोग सहज बरे होऊ शकतात. प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट, कॅलरीज आणि फायबर हे निरोगी पदार्थांमध्ये आढळतात. यासोबतच हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे इन्फेक्शनमुळे होणाऱ्या समस्या कमी करण्यात मदत करतात. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असून कानाच्या संसर्गामध्ये (Ear Infection) देखील वापरले हळद वापरली जाऊ शकते. कान दुखत असेल किंवा इन्फेक्शन झाले असेल तर त्यासाठी हळदीचा वापर कसा करावा ते जाणून घेऊया.

हळद व नारळाचे तेल

हळदीच्या पावडरच्या वापराने कान दुखणे आणि इन्फेक्शनमध्ये आराम मिळतो. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे कानाच्या नसांना आराम दण्यास मदत करतात. ते वापरण्यासाठी, न चमचे खोबरेल तेलात एक चमचा हळद पावडर मिसळा. त्यानंतर हे मिश्रण 4 ते 5 मिनिटे गॅसवर गरम करा. यानंतर ते गॅसवरून उतरवा आणि कोमट झाल्यावर कानात तेलाचे काही थेंब कापसाच्या साहाय्याने टाका. यानंतर कानाचे छिद्र कापसाने झाकून टाका.

हळदीचे पाणी

या उपायासाठी एक कप पाणी घ्या. त्यात चिमूटभर हळद घालून उकळा. यानंतर हे पाणी गॅसवरून काढून थोडे कोमट होऊ द्या. कोमट पाण्याचे काही थेंब कानात टाका. यामुळे कानातल्या घाणीमुळे होणारा त्रास आणि संसर्ग कमी होतो. तसेच कानातील मळ (Ear Wax)मऊ होऊन सहज बाहेर येतो.

हळद आणि लसणाचे तेल

हे तेल बनवण्यासाठी लसणाच्या 2 ते 3 कळ्या बारीक करा. यानंतर एका पॅनमध्ये सुमारे दोन चमचे खोबरेल तेल टाका. आता त्यात ठेचलेला लसूण आणि चिमूटभर हळद घालून गरम करा. हे तेल साधारण चार ते पाच मिनिटे उकळू द्या. यानंतर गॅसवरून काढून गाळून घ्या. कान दुखत असल्यास या तेलाचे काही थेंब टाका.

मात्र कानाच्या अनेक आजारांमध्ये घरगुती उपायांचा अवलंब करू नये. जर तुम्हाला सतत कानात वेदना होत असतील तर कोणत्याही प्रकारचे तेल वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. तसेच, लहान मुलाला कान दुखत असल्यास ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या.

मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा.
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर.
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी.
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती...
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती....
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात.
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?.
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर.
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?.
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य.