Fathers day 2022: वृद्ध वडिलांना निरोगी पाहायचे असेल तर, ‘फादर्स डे’ निमीत्त करा ‘या’ भेटवस्तू ची खरेदी.. जाणून घ्या, ‘फादर्स डे’ चे वडीलांसाठी बेस्ट गीफ्ट!

आपल्या मुलाला एक सक्षम व्यक्ती (Competent person) बनवण्यासाठी बापाचे संपूर्ण आयुष्य खर्ची होते. आपल्या मुलांनी नेहमी हसत राहावे त्यांच्या सगळ्या गरजा कुठलीही अडचन न येता पूर्ण करता याव्यात यासाठी वडील आपल्या अनेक छोट्या मोठ्या इच्छा मारून मुलांच्या गरजांना प्राधान्य देतात. कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये ते स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासही दुर्लक्ष करतात. अशा परिस्थितीत वडिलांची काळजी घेण्याची जबाबदारी […]

Fathers day 2022: वृद्ध वडिलांना निरोगी पाहायचे असेल तर, ‘फादर्स डे’ निमीत्त करा ‘या’ भेटवस्तू ची खरेदी.. जाणून घ्या, ‘फादर्स डे’ चे वडीलांसाठी बेस्ट गीफ्ट!
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 4:48 PM

आपल्या मुलाला एक सक्षम व्यक्ती (Competent person) बनवण्यासाठी बापाचे संपूर्ण आयुष्य खर्ची होते. आपल्या मुलांनी नेहमी हसत राहावे त्यांच्या सगळ्या गरजा कुठलीही अडचन न येता पूर्ण करता याव्यात यासाठी वडील आपल्या अनेक छोट्या मोठ्या इच्छा मारून मुलांच्या गरजांना प्राधान्य देतात. कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये ते स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासही दुर्लक्ष करतात. अशा परिस्थितीत वडिलांची काळजी घेण्याची जबाबदारी मुलांनी घेणे गरजेचे आहे. वडीलांच्या निस्वार्थ प्रेम आणि त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त (Express gratitude) करण्यासाठी दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यावेळी 19 जून रोजी फादर्स डे (Fathers day 2022)साजरा केला जाणार आहे. जर तुमचे वडील म्हातारे झाले असतील तर या फादर्स डेच्या (Father’s Day) दिवशी त्यांना अशा वस्तू भेट द्या, ज्यामुळे ते निरोगी होऊ शकतात.

फिटनेस बँड

या वयात वडिलांसाठी फिटनेस बँड खूप उपयुक्त ठरू शकतात. हा बँड तुमच्या वडिलांना भेट द्या आणि हा बँड कसा वापरायचा ते सांगा. वडिलांना हातावर ही पट्टी सहज बांधता येते. याद्वारे, आपण हृदयाच्या गतीचे 24/7 निरीक्षण करू शकता, रक्तातील ऑक्सिजन पातळीबद्दल देखील माहिती मिळवू शकता. यासोबतच कॅलरी काउंट, व्यायाम, झोपेची सायकल, चालण्याची गती, अंतर आदींची नोंदही तपासता येते.

ग्लुकोमीटर

मधुमेह ही एक अशी समस्या आहे जी म्हातारपणी लोकांना त्रास देते. ही एक अशी समस्या आहे ज्याचे वेळोवेळी निरीक्षण करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही तुमच्या वडिलांना ग्लुकोमीटरही भेट देऊ शकता. हे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

हे सुद्धा वाचा

वर्कआऊट आऊटफीट

जर तुमचे वडील रोज व्यायाम करत असतील तर तुम्ही यावेळी त्यांना फादर्स डेच्या दिवशी वर्कआउटचे कपडे भेट देऊ शकता. ते परिधान केल्याने ते सहजपणे कसरत करू शकतील. याशिवाय वडील जर रोज फिरायला जात असतील तर तुम्ही त्यांना यासाठी सर्वोत्तम शूज भेट देऊ शकता.

योग चटई

वाढत्या वयात आरोग्यासाठी योग, प्राणायाम आणि ध्यान करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. योग आणि प्राणायाम वडिलांना फुफ्फुस, हृदय अशा सर्व समस्यांपासून वाचवतात, तर ध्यान त्यांना तणावमुक्त ठेवते. जर ते आधीच हे करत असतील, तर त्यांना योग चटई भेट द्या, जेणेकरून ते या रोलिंग मॅटसह उद्यानात किंवा खुल्या ठिकाणी हे करू शकतील. जर ते योगसाधना करत नसतील तर त्यांना ही चटई भेट देऊन त्यांचा नित्यक्रमात समावेश करण्यास प्रवृत्त करा.

ग्रीन टी किट

म्हातारपणी बहुतेकांना चहा पिण्याची सवय असते. पण चहा आरोग्यासाठी चांगला नाही. तुम्ही तुमच्या वडिलांना ग्रीन टी किट भेट द्या आणि त्यांना सामान्य चहा बदलण्यास सांगा. ग्रीन टी त्यांचे आरोग्य सुधारण्याचे काम करेल.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.