या तीन फळांचा ज्यूस चुकूनही पिऊ नका, आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडेल

तज्ज्ञांच्या मते, फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे कारण त्यात फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात. पण असे काही फळे आहेत ज्यांचे ज्यूस पिणे आरोग्यासाठी हानिकारक नक्कीच ठरू शकतं. पाहुयात ते तीन फळे कोणती आहेत ती.

या तीन फळांचा ज्यूस चुकूनही पिऊ नका, आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडेल
avoid drinking the juice of these three fruits
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 08, 2025 | 3:41 PM

आपण अनेकदा म्हणतो की फळांचा ज्यूस पिणे खूप फायदेशीर असते. पण हे 90 टक्के लोकांना माहित नसेल की असेही काही फळे आहेत ज्यांचा ज्यूस प्यायल्याने आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडेल. या फळांचा रस आरोग्याला खूप हानी पोहोचवतो.

अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की काही फळांचा ज्यूस फायद्यापेक्षा जास्त नुकसानकारक ठरू शकतात, ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात. पण तीन फळांच्या ज्यूसबाबत तज्ज्ञांनी एक विशेष इशारा दिला आहे. त्यांचे जास्त सेवन केल्याने मधुमेह, दातांच्या समस्या, पचनसंस्थेचे विकार आणि अगदी स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

फळांचा ज्यूस बनवला जातो तेव्हा….

तज्ज्ञांच्या मते, फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे कारण त्यात फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात. तथापि, जेव्हा या फळांचा ज्यूस बनवला जातो तेव्हा त्यातील फायबर जवळजवळ संपून जातं आणि साखरेचे प्रमाण वाढतं.खरंतर, ज्यूमध्ये असलेली ही अतिरिक्त साखर शरीरात वेगाने शोषली जाते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते. सतत रस पिल्याने मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयरोग होऊ शकतो.याशिवाय पॅकेज केलेल्या ज्यूसमध्ये प्रिझर्वेटिव्ह्ज, कृत्रिम रंग आणि अतिरिक्त साखर मिसळली जाते, जे आरोग्यासाठी अधिक धोकादायक आहे.

या तीन फळांचा ज्यूस पिणे टाळा

चला तुम्हाला त्या तीन फळांच्या ज्यूसबद्दल सांगूया जे आरोग्याला हानी पोहोचवू शकतात.

संत्र्याचा रस: यात संत्र्याचा रस हा जगातील सर्वात लोकप्रिय पेयांपैकी एक आहे. तो व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानला जातो, परंतु अनेक संशोधनांनी त्याचे तोटे देखील सांगितले आहेत. यूकेच्या तज्ज्ञांच्या मते, संत्र्याचा रस पिल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते कारण त्यात फायबरचे प्रमाण खूप कमी असते. एका ग्लास संत्र्याच्या ज्यूसमध्ये 110 कॅलरीज आणि 20 ते 26 ग्रॅम साखर असते, ज्यामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

आंबा: आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते, परंतु त्याचा ज्यूस मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकतो. आंब्याच्या रसात भरपूर नैसर्गिक साखर म्हणजेच फ्रुक्टोज असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते. एका ग्लास आंब्याच्या रसात सुमारे 30-35 ग्रॅम साखर असू शकते, जी मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक आहे.

स्ट्रॉबेरी: स्ट्रॉबेरीच्या ज्यूसमध्ये भरपूर नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी खूप लवकर वाढते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा ज्यूस खूपच हानिकारक ठरू शकतो.