सतत लॅपटॉपवर काम करून डोळे दुखतायत? तर ‘या’ टिप्स फाॅलो करा!

सतत लॅपटॉपवर काम करून डोळे दुखतायत? तर 'या' टिप्स फाॅलो करा!
वर्क फ्रॉम होम

कोरोना व्हायरसमुळे आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये मोठा बदल झाला आहे. कार्यालयातील बहुतेक काम घरातूनच पूर्ण केले जात आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jul 12, 2021 | 11:05 AM

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये मोठे बदल झाले आहेत. कार्यालयातील बहुतेक काम घरातूनच पूर्ण केले जात आहे. या नवीन ट्रेंडमध्ये स्वत:ला रुळवून घेण्यात अजूनही बर्‍याच लोकांना त्रास होत आहे. (If you are having eye problems due to work from home, follow these tips)

‘वर्क फ्रॉम होम’मुळे आपण आपला बहुतेक वेळ लॅपटॉप स्क्रीन किंवा मोबाईल स्क्रीन पाहण्यात घालवत असतो. त्याचा थेट परिणाम आपल्या डोळ्यांवर पडतो. सतत संगणकाच्या पडद्यासमोर काम केल्याने आपले डोळे दिवसभर थकलेले दिसतात. यामुळे काही कालावधीनंतर डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागतात.

डोळे धुवा

वर्क फ्रॉम होम करताना आपण सतत स्क्रीनकडे बघतो. यामुळे डोळ्यांना त्रास होतो. डोळ्यांचा त्रास दूर करण्यासाठी आपण थोड्या-थोड्या वेळाने आपले डोळे धुतले पाहिजेत. यामुळे डोळ्यांना आराम मिळण्यास मदत होते.

डोळ्यांना तेल लावा

रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या डोळ्यांना खोबरेल तेल आणि बदाम तेल मिक्स करून लावा. यामुळे डोळ्यांना आराम आणि थंडपणा मिळेल. रात्री लावलेले तेल सकाळी धुवावे.

मासे खा

सैल्मन, टूना, सार्डिन, ट्राउट, मॅकरेल या मासांमध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिड असते. ओमेगा -3 फॅटी अॅसिड आपल्या डोळ्यासाठी जास्त फायदेशीर असते. यामुळे आपण आहारात जास्तीत-जास्त मासांच्या समावेश केला पाहिजे.

नैसर्गिक ओलावा

डोळ्यांचा नैसर्गिक ओलावा कायम राखण्यासाठी कृत्रिम अश्रू, ल्युब्रिकंट किंवा आय ड्रॉपसारख्या पर्यायी घटकांची मदत होते. त्यांचा वापर केला तर डोळ्यांचा कोरडेपणा रोखण्याबरोबरच कोणत्याही प्रकारचा संसर्ग रोखण्यासाठी ओलावा जतन करून ठेवणे शक्य होते.

संगणक आणि लॅपटॉप

संगणक आणि लॅपटॉपवर काम करत असताना, आपले डोळे आणि स्क्रीन दरम्यान कमीत कमी 20 इंच अंतर असले पाहिजे. मोबाईल आणि लॅपटॉपचा निळा प्रकाश टाळण्यासाठी आपण हलका पिवळा प्रकाश किंवा निळा प्रकाश असणारा फिल्टर अ‍ॅप वापरू शकता.

शारीरिक आणि मानसिक त्रास वाढला!

वर्क फ्रॉम होममुळे घरातून काम करणाऱ्यांच्या कामाचे तास वाढल्याचे दिसून आले आहे. अनेकजण कामाच्या निर्धारित तासांपेक्षा एक ते दोन तास अधिक काम करतात, असे दिसून आले आहे. या संकल्पनेमुळे नवीन कौशल्य शिकण्याच्या क्षमतेवरही परिणाम झाला आहे. वर्क फ्रॉम होमच्या करण्यात आलेल्या सर्वेत 64 टक्के लोकांनी आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याचे सांगतिले. 75 टक्के लोकांनी वर्क फ्रॉमहोममुळे मानसिक संतुलन बिघडल्याचे सांगतिले. अशा समस्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

डोळ्यांखाली वारंवार सूज येतेय? मग, ‘हे’ उपाय नक्की करून पाहा!

(If you are having eye problems due to work from home, follow these tips)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें