आशिया कपसाठी दुबईला जाण्याचा विचार करताय? स्वस्त हॉटेल्स कुठे आणि कशी मिळतील जाणून घ्या, ट्रिप होईल बजेट फ्रेंडली

आशिया कप पाहण्यासाठी किंवा ट्रिपसाठी दुबईला जाण्याचा विचार करत आहात? पण बजेटमध्ये बसणारे स्वस्त हॉटेल्स मिळण्याची चिंता असेल तर हे पर्याय नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. ते कोणते पर्याय आहेत आणि कशापद्धतीने तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता हे जाणून घेऊयात.

आशिया कपसाठी दुबईला जाण्याचा विचार करताय? स्वस्त हॉटेल्स कुठे आणि कशी मिळतील जाणून घ्या, ट्रिप होईल बजेट फ्रेंडली
If you are planning a trip to Dubai, let learn how and where to find budget-friendly hotels in Dubai
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 14, 2025 | 3:14 PM

आशिया कप सुरू झाला आहे. अनेकांनी या सामन्यांसाठी तिकिटे बुक केली असतील किंवा तुम्ही येणारे सामने पाहण्यासाठी दुबईला जाण्याचा विचार करत असाल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहण्याची व्यवस्था. कारण बजेट फ्रेंडली ट्रिप होणं हा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. बऱ्याचवेळा इंटरनेटवर शोधूनही बजेट फ्रेंडली म्हणजे स्वस्त अशी हॉटेल्स मिळत नाहीत. तर चला जाणून घेऊयात दुबईमध्ये राहण्याचे काही स्वस्त आणि सर्वोत्तम पर्याय असणारी हॉटेल्स ज्यामुळे तुम्ही हजारो रुपये वाचवू शकता.

बजेट फ्रेंडली ट्रिप

दुबई हे त्याच्या आलिशान जीवनासाठी आणि आलिशान हॉटेल्ससाठी ओळखले जाते. दुबईतील ट्रिप ही स्वर्गापेक्षा कमी नाही. आता क्रिकेटच्या निमित्ताने अनेकांना दुबईला जाण्याची इच्छा आहे. त्याआधी बजेट डोळ्यासमोर येतं. अशा परिस्थितीत स्वस्त हॉटेल्स कुठे आणि कशी मिळतील याबाबत सर्च करण्यास सुरुवात होते पण नेटवर हवी तशी आणि तेवढी माहिती मिळत नाही. चला जाणून घेऊयात की बजेट-फ्रेंडली ट्रिपसाठी हॉटेल्सचे कोणते पर्याय आहेत ते तसेच, फ्लाइट बुकिंग टिप्सबाबतही जाणून घेऊयात.

फ्लाइट बुकिंग टिप्स

जर तुम्ही दुबईसाठी तिकीट बुक करत असाल तर सर्व एअरलाइन्स आणि वेबसाइटवरील दर तपासा.एकाच वेळी परतीचे तिकीट देखील बुक करण्याचा प्रयत्न करा, यामुळे तुम्हाला थोडा कमी खर्च येऊ शकतो. पण फक्त दुबईच नाही तर इतर कोणत्याही ट्रिपसाठी तुम्ही जाणार असाल तर काही दिवस आधीच तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करा कारण. सिझनमध्ये बुकिंग केल्याने तुम्हाला हजारो रुपये खर्च एक्स्ट्रा येऊ शकतो.

स्वस्त हॉटेल्स कुठे आणि कशी मिळतील?

दुबईमध्ये तुम्हाला हजारो हॉटेल पर्याय मिळतील, परंतु जर तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये हॉटेल हवे असेल तर तुम्हाला या काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.

1. देहरा दुबईचा परिसर खूपच स्वस्त मानला जातो, येथे तुम्हाला 50 ते 60 दिरहममध्ये हॉटेल मिळतील.

2. अनेक भारतीयांना Burदुबईमध्ये राहायला आवडतं. कारण तिथे हॉटेल्स खूप स्वस्त दरात उपलब्ध असतात.

3. जर तुमचे बजेट थोडे जास्त असेल तर तुम्ही स्वतःसाठी अपार्टमेंट किंवा एअर बीएनबी देखील बुक करू शकता.

या गोष्टीही लक्षात ठेवा

तुमच्या बजेट फ्रेंडली ट्रिपसाठी, तुम्ही दुबईमध्ये शक्य तितके पब्लिक ट्रांसपोर्ट वापरू शकता ते जास्त सोयीचंही पडेल. येथे कॅब बुक करणे खूप महाग असू शकते. याशिवाय, तुम्ही स्थानिक बाजारपेठेत स्ट्रीट फूडचा देखील आनंद घेऊ शकता. त्यामुळे फक्त आशिया कपसाठीच नाही तर इतर कोणत्याही कारणासाठी तुम्ही दुबई ट्रिपवर जाऊ इच्छित असाल तर नक्कीच हे पर्याय ट्राय करा.

 

 

 

Follow Us