AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनाला शांतता हवी आहे तर या ठिकाणाला नक्की भेट द्या, 3 दिवसात तणाव गायब

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीला वैतालगला आहात. जर तुम्हाला तुमच्या मनाला शांतता हवी असेल. तुम्हाला तर तणाव डिटॉक्स करायचा असेल तर तुम्ही एका ठिकाणाला नक्की भेट देऊ शकता. यासाठी फक्त तुम्हाला तीन दिवस द्यायचे आहेत. येथील शांतता तुम्हाला खूप आनंद देऊन जाईल.

मनाला शांतता हवी आहे तर या ठिकाणाला नक्की भेट द्या, 3 दिवसात तणाव गायब
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jul 03, 2024 | 9:02 PM
Share

गौतम बुद्धांचे हे शहर शांततेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. ही जागा खूप खास आहे. विशेषत: त्या लोकांसाठी ज्यांना मानसिकदृष्ट्या डिटॉक्स करायचे आहे. तुम्ही मानसिकरित्या थकले असाल किंवा तुम्हाला शांततेची गरज आहे तर तुम्ही तुम्ही या जागेला नक्की भेट दिली पाहिजे.  मानसिकदृष्ट्या ही जागा तुम्हाला शांत करते. कारण इथे तुम्ही स्वतःला निसर्गाची जोडता. आयुष्यातील प्रत्येक तणाव तुम्ही काही काळासाठी दूर करु शकतात. या ठिकाणी तुम्हाला भेट देण्यासाठी बरंच काही आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या या व्यस्त जीवनातून काही वेळ काढून इथे नक्की आले पाहिजे. येथे जर तुम्हाला भेट द्यायची आहे तर तुम्ही ३ दिवसांची सुट्टी काढली पाहिजे. चला आज या जागेबद्दल जाणून घेऊयात.

बोधगया हे जगातील सर्वात महत्वाचे ठिकाण आहे. येथेच एका वटवृक्षाखाली गौतम यांनी परम ज्ञान मिळवले आणि ते बुद्ध झाले. हा सामान्य मुलगा नंतर गौतम बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या ज्ञानाने संपूर्ण जग आनंदित होऊ लागले. तेव्हापासून जगभरातील लोक या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात.

महाबोधी मंदिर

या ठिकाणी असलेले महाबोधी मंदिर हे सम्राट अशोका यांनी बांधले आहे. हे एक बौद्ध मंदिर आहे. जे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे. मंदिराच्या जवळच मुचलिंद सरोवर आहे. जेथे तुम्ही भेट देऊ शकता. येथील आजूबाजूचा परिसर अतिशय शांत आहे. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होऊ शकते.

बोधी वृक्ष

बोधी वृक्ष एक पिंपळाचे वृक्ष आहे. ज्याच्या खाली बसून भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले होते. हृदयाला आनंद देणारे हे झाड पाहण्यासाठी आजही लोकं येथे जगभरातून येत असतात. याच्या आजूबाजूला खूप शांतता आहे जी तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवताना मनाला विश्रांती देते.

ग्रेट बुद्ध मंदिर

ग्रेट बुद्ध मंदिर देखील खूपच खास आहे. या मंदिरात भगवान बुद्धांची मोठी मूर्ती आहे. मंदिराच्या आजूबाजूला शांत आणि आनंदी करणारे वातावरण आहे. संपूर्ण क्षेत्र तत्त्वज्ञान आणि ध्यानाच्या अभ्यासासाठी एक शांत आश्रयस्थान आहे. हे भारतातील बोधगया येथे स्थित असलेले तिबेटी परंपरेतील एक बौद्ध केंद्र आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा