बजेट ट्रिप प्लॅन करताय? ही आहेत काही ‘ऑफ बीट’ठिकाणं , तुमच्या पार्टनरसोबत या ठिकाणी नक्की जा

| Updated on: Oct 28, 2021 | 2:35 PM

बर्‍याचदा लोकांना प्रवासाची खूप आवड असते, परंतु तरीही प्रत्येकाला वाटते की जर त्यांनी बजेटमध्ये राहून आपली सहल पूर्ण केली तर खूप चांगले होईल. आज आम्‍ही तुम्‍हाला कपल्‍ससाठी फिरण्याचे उत्तम पर्याय सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहेत ही ठिकाणे

बजेट ट्रिप प्लॅन करताय? ही आहेत काही ‘ऑफ बीट’ठिकाणं , तुमच्या पार्टनरसोबत या ठिकाणी नक्की जा
best-place
Follow us on

मुंबई : लग्नाचा सीझन आला आहे. सध्या अनेक जोडपी त्यांच्या हनिमूनसाठी काही ठिकाणे ठरवत असतील. भारतात हनिमूनसाठी अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे जोडपे हनिमून एन्जॉय करतील. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत गर्दीपासून दूर शांत ठिकाणी जायचे असेल तर यासाठी अनेक खास ठिकाणे तुमच्यासाठी खास आहेत. चला तर मग भारतातील काही न ऐकलेल्या ठिकाणांबद्दल जाणून घेऊया जिथे तुम्ही बजेटमध्ये आरामात राहून तुमचा हनिमून एन्जॉय करू शकता.

हाफलांग, आसाम

तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत निसर्गाने संपन्न असणाऱ्या ईशान्येकडील राज्यांमध्ये फिरण्याचा आनंद घेऊ शकता. अशा परिस्थितीत आसाममधील हाफलांग हे हनिमून कपल्ससाठी उत्तम ठिकाण आहे. लोक ह्या ठिकाणाशी विशेष परिचित नसले तरी हे ठिकाण तुम्हाला नवीन अनुभूती देईल. इथले आकाश आणि आजूबाजूचे सौंदर्य तुम्हाला आनंद देणार आहे. हाफलाँग हे खरेदीसाठीही उत्तम ठिकाण आहे.

तारकर्ली, महाराष्ट्र

प्रत्येकाला आपल्या जोडीदाराचा हात धरून अथंग समुद्रावर फिरू वाटत असते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला खरोखरच या गोष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही तारकर्लीला जाऊ शकता. हे ठिकाण समुद्र किनाऱ्याचे सौंदर्य सादर करते.विशेष म्हणजे येथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत पाण्याखालील जीवन देखील पाहू शकता. इथे स्कूबा डायव्हिंग, डॉल्फिन स्पॉटिंगपासून ते पॅराग्लायडिंगपर्यंत, तुम्ही येथे समुद्री स्पोर्टसचा तुम्ही अनुभव घेऊ शकता

हम्पी, कर्नाटक

जर तुम्हाला इतिहासात रस असेल तर हंपी तुमच्यासाठी खूप खास आणि खास ठिकाण असू शकते. जर तुम्हाला कमी पैशात फिरु शकता. खरं तर इथले अवशेष आणि खडक तुम्हाला खूप भुरळ घालू शकतात.

सायलेंट व्हॅली, केरळ

केरळ हे हनिमून डेस्टिनेशनसाठी खूप प्रसिद्ध आहे. पण येथे काही ठिकाणे आहेत जी गर्दीपासून दूर आहेत जिथे तुम्ही रोमँटिक हनीमूनसाठी जाऊ शकता. तुम्ही तेथे बेकल, वायनाड आणि सायलेंट व्हॅली सारखी ठिकाणे नक्कीच निवडू शकता.

टॉपस्लीप, पारंबीकुलम आणि वालपराई, अन्नामलाई

हिरव्यागार जंगलात फिरण्यासाठी तुम्ही अन्नामलाईचे टॉपस्लिप, पारंबीकुलम आणि वालपराई निवडू शकता.

इतर बातम्या :

Hair parting| सणांच्या दिवसात नवीन लुक हवाय? आता तुमच्या चेहऱ्यानुसार हेअर पार्टिंग निवडा

Protein Diet | आहारात 5 गोष्टींचा समावेश करा, प्रथिनांची कधीही कमी जाणवणार नाही

आता झोपा काढा आणि पैसा कमवा, या 5 जॉबची भन्नाट ऑफर; काय आहे फंडा?