
आजच्या धकाधकीच्या जीवनात फक्त शारीरिक नाही तर मानसिक आरोग्य बिघडत आहे… सतत येत असलेला तणाव यामुळे चिडचिड होते आणि अखेर घरात भांडणं होतात. पण तुम्हाला तुमचं मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवायचं असेल तर रोज घरात असे खेळ खेळा ज्यामुळे होणार तणाव कमी होईल आणि डोकं देखील शांत राहिल… आपण अनेकदा असे विचार करतो की खेळ फक्त मुलांसाठी आहेत, परंतु सत्य हे आहे की खेळणं प्रत्येक वयात महत्वाचं आहे.
आजचे धावपळीचे जीवन, कामाचा ताण, घरातील जबाबदारी आणि तणावपूर्ण नातेसंबंध यांचा आपल्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत, दररोज काही मिनिटं घरातील खेळ खेळल्याने केवळ मनाला समाधान मिळत नाही तर मानसिक शक्ती देखील वाढते.
डॉ. कल्पना रावल यांनी दिलेल्या माहितीनुसार, इनडोअर गेम्स हे केवळ मनोरंजनच नाही तर मानसिक आरोग्यासाठी एक प्रकारचा व्यायाम देखील आहे. सततचा ताण, चिंता आणि नैराश्य आपली विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमकुवत करू शकते. अशा परिस्थितीत, जर आपण दररोज काही मेंदूचे खेळ खेळलो तर आपला मूड चांगला राहतोच, शिवाय आपली स्मरणशक्ती आणि एकाग्रता देखील सुधारते. त्यामुळे घरातील सदस्यांसोबत खेळ खळणं देखील फार महत्त्वाचं आहे.
बुद्धिबळ: बुद्धिबळ देखील एक उत्तम खेळ आहे. हा खेळल्याने मेंदूची संज्ञानात्मक क्षमता सुधारते. ते आपल्याला रणनीती आखण्यास, धीर धरण्यास आणि विचारपूर्वक निर्णय घेण्यास शिकवते. शिवाय लहान मुलांसाठी देखील बुद्धिबळ फार महत्त्वाचा आहे.
शब्दकोडं सोडवणं: शब्दकोडं किंवा कोडी सोडवल्याने मेंदू व्यस्त आणि सक्रिय राहतो. यामुळे एकाग्रता आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये सुधारतात. अनेक न्यूजपेपरमध्ये देखील शब्दकोडी असतात, जे सोडवल्यामुळे आनदं देखील मिळतो…
लुडो आणि कॅरम: लुडो आणि कॅरमसारखे खेळ फक्त मुलांसाठी नाहीत तर संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणण्यास मदत करतात. एकत्र खेळल्याने ताण कमी होतो आणि नातेसंबंधांमध्ये सकारात्मकता येते.
मेमरी टेस्ट गेम्स: पत्ते खेळ किंवा मेमरी टेस्ट गेम्स मेंदूची धारणा शक्ती वाढवतात. हे विशेषतः विद्यार्थी आणि वृद्धांसाठी खूप उपयुक्त मानलं जातं.
दररोज किमान 20 ते 30 मिनिटं इनडोअर गेम खेळण्याची सवय लावा. तुमच्या आवडी आणि मानसिक आराम लक्षात घेऊन गेम निवडा. इलेक्ट्रॉनिक गेमऐवजी माइंड अॅक्टिव्हिटी गेम निवडा. कुटुंबासोबत खेळा जेणेकरून सामाजिक बंधनही मजबूत होईल आणि कुटुंबातील प्रेम वाढेल…