तुमच्या बजेटनुसार भारतातील ‘या’ 5 लोकप्रिय ठिकाणांना देऊ शकता भेट

भारताचे नैसर्गिक सौंदर्य शब्दात मांडणे कठीण आहे. त्यातच ऐतिहासिक स्थळांच्या समृद्ध वारसा जपलेल्या काही ठिकाणांना आपल्याला बरेच काही जाणून घ्यायचे आहे आणि त्यासाठी त्या ठिकाणांना भेट देणे चांगले काहीही नाही. या लेखात आपण अशा पाच लोकप्रिय पर्यटन स्थळांबद्दल जाणून घेऊया जे नैसर्गिक सौंदर्य, कला आणि ऐतिहासिक वारसा जपलेले आहेत. या ठिकाणांना भेट देण्याचे नियोजन बजेटमध्ये देखील करता येते.

तुमच्या बजेटनुसार भारतातील या 5 लोकप्रिय ठिकाणांना देऊ शकता भेट
पर्यटनस्थळ
Image Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Jun 05, 2025 | 1:58 PM

भारताचे उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे असलेले नैसर्गिक सौंदर्य शब्दात मांडणे कठीण आहे. कारण आपल्या भारतात अशी सुंदर पर्यटन स्थळे आहेत जी पर्यटकांसाठी स्वर्गापेक्षा कमी नाहीत. मात्र अशी काही ठिकाणे आहेत जी आपल्या लोकांमध्ये व परदेशी पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत आणि म्हणूनच पर्यटक नेहमीच या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात. त्यातच सुट्टीच्या दिवसांमध्ये या ठिकाणी हजारोंच्या संख्येने गर्दी असते. अशातच डोंगराळ भागांमध्ये निसर्गप्रेमी निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी तर काही ठिकाणी लोकं कला जवळून जाणून घेण्यासाठी भेट देत असतात. विशेष म्हणजे या ठिकाणी ट्रिपला जाण्याचे नियोजन करण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करण्याची आवश्यकता नाही. योग्य नियोजन करून तुम्ही कमी बजेटमध्ये एक संस्मरणीय ट्रिप बनवू शकता.

तुम्ही कलाप्रेमी आहात ॲडव्हेंचरचे शौकीन आहात, किंवा ऐतिहासिक ठिकाणे एक्सप्लोर करायचे आहे आणि निसर्गाच्या कुशीत शांत वेळ घालवू इच्छिता, तर आपल्या भारतात अशी प्रत्येक जागा आहे जिथे जाणे तुमच्यासाठी एक उत्तम अनुभव देणारा असेल. सध्या तुमच्या सुट्टीचे काही दिवस मजेदार बनवण्यासाठी या लेखात आम्ही तुम्हाला काही लोकप्रिय पर्यटन स्थळांबद्दल सांगणार आहोत जे बजेट-फ्रेंडली देखील आहेत.

आग्रा एक्सप्लोर करा

तुम्हाला जर आग्रा शहर एक्सप्लोर करायचे असेल तर एक ते दोन दिवसांच्या बजेट फ्रेंडली ट्रिपची प्लॅन आखत येऊ शकतो. देश-विदेशातील पर्यटक आग्रा येथे अनेक ऐतिहासिक वास्तुना भेट देण्यासाठी येतात. उत्तर प्रदेशात स्थित आग्राचा ताजमहाल कला आणि प्रेमाचे प्रतीक आहे, ज्याचे सौंदर्य सर्वांचे मन जिंकते. तुम्ही बस, ट्रेन किंवा विमानाने देखील जाऊ शकता. जर तुम्ही दिल्लीहून आग्राला जात असाल तर बस सर्वोत्तम आहे. उत्तर प्रदेश ट्रान्सपोर्टची बस बुक करा, ज्याचे भाडे खाजगी बसपेक्षा कमी आहे. येथे पोहोचल्यानंतर, ताजमहालला जाण्यासाठी तिथल्या स्थानिक वाहनाचा वापर करा. तसे, जर तुम्हाला आग्रातील फक्त ताजमहाल पहायचा असेल तर हे एका दिवसात पाहू शकता. ज्यामध्ये तुम्हाला फक्त 2000 पर्यंत खर्च येईल. परंतु जर तुम्हाला आग्रातील इतर ठिकाणांना भेट द्यायची असेल आणि एका रात्रीसाठी राहण्याची योजना आखली असेल तर तुम्ही फक्त 8-10 हजारांच्या बजेटमध्ये ही ट्रिप सहजपणे पूर्ण करू शकता.

शिमला

हिमाचल प्रदेशातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक असलेल्या शिमलाला भेट देणे हे बहुतेक लोकांचे स्वप्न असते. येथील स्थानिक बाजारपेठा आणि नैसर्गिक सौंदर्य तुमचे मन जिंकेल. शिमलाला जाण्यासाठी तुम्ही दिल्लीहून हिमाचल परिवहन किंवा खाजगी बस बुक करू शकता. पर्वतांच्या कुशीत वसलेले हे ठिकाण प्रत्येक ऋतूत सुंदर दिसते आणि बजेट फ्रेंडली देखील आहे. जर तुम्ही शिमलाला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशात 10-11 हजार असणे पुरेसे आहे. शिमलामध्ये एक किंवा दोन रात्री राहण्यासाठी 500 ते 1000 च्या दरम्यान हॉटेल्स मिळतील. खाण्यासाठी तिथले स्थानिक जेवणांची आस्वाद नक्की घ्या, जे सर्वोत्तम असेल. शिमलामध्ये फिरण्यासाठी, तुम्ही स्कूटी किंवा कार भाड्याने घेऊ शकता. तुम्हाला ते 600-800 रुपयांत मिळेल.

पिंक सिटी जयपूर

जयपूर हे शहर ज्याला गुलाबी शहर म्हणूनही ओळखले जाते, ते भारतीय आणि परदेशी लोकांसाठी एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. जयपूर ही एक ऐतिहासिक इमारत आहे जिथे भारताच्या इतिहासाची झलक दिसते. उन्हाळा असो वा हिवाळा, जयपूर पर्यटकांनी गजबजलेले असते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दिल्ली ते जयपूरचा प्रवास फक्त 5 ते 6 हजार रुपयांमध्ये पूर्ण करता येतो. दिल्लीहून तुम्हाला सहज बस मिळेल जी तुम्हाला जयपूर शहरात सोडेल. फक्त 5 ते 6 तासांच्या प्रवासानंतर तुम्ही जयपूरला पोहोचाल. तुम्ही जयपूरमधील हवा महल आणि इतर ठिकाणी भेट देऊ शकता. जयपूरचा बाजार खूप प्रसिद्ध आहे जिथे तुम्ही खरेदी करू शकता. तसेच, जयपूरमध्ये खाण्यापिण्यासाठी अनेक पर्याय आहेत, जसे की तुम्ही राजस्थानचा प्रसिद्ध दाल बाटी चुरमा, गट्टे की सब्जी खाऊ शकता. तुम्ही 100 ते 200 रूपयांमध्ये पोटभर जेवण जेऊ शकता.

अमृतसर येथील प्रसिद्ध सुवर्ण मंदिर

पंजाबमध्ये असलेले अमृतसर हे खूप लोकप्रिय आहे. सुवर्ण मंदिर हे अमृतसरमधील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे जिथे तुम्ही शीख समुदायाचा अमूल्य वारसा पाहू शकता. अमृतसरला जाण्यासाठी तुम्ही ट्रेन किंवा बस निवडू शकता. जर तुम्ही पंजाब ट्रान्सपोर्ट बसने गेलात तर तुम्हाला कमी भाड्याने प्रवास करता येईल. अमृतसरमध्ये राहण्यासाठी तुम्हाला 500 ते 1000 रुपयांपर्यंत हॉटेल रूम मिळतात. तसेच, खाण्यासाठी पंजाबी जेवणापेक्षा चांगले काहीही नाही. तुम्ही तिथे स्थानिक जेवणाची चव चाखू शकता जे बजेटमध्ये चवीने परिपूर्ण असेल. त्यातच तुम्ही तिथे लंगरचा आनंद घेऊ शकता. तुम्ही 5000 ते 7000 रुपयांमध्ये अमृतसरला भेट देऊ शकता.

नैनिताल, तलावांचे शहर

जर तुम्हाला पर्वत आणि तलाव आवडत असतील तर नैनिताल तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासह आणि मित्रांसह नैनितालला भेट देऊ शकता. जर तुम्ही येथे जाण्यासाठी बस निवडली तर प्रवास तुमच्यासाठी सोपा होईल. नैनितालसाठी 10,000 रुपयांपर्यंतचे बजेट पुरेसे असेल. तुम्ही येथील नैना देवी मंदिराला भेट देऊ शकता आणि तलावांचे दृश्य तुम्हाला मोहित करेल. नैनितालमध्ये जेवणापासून ते हॉटेल भाड्यापर्यंत, सर्वकाही बजेट-अनुकूल आहे.