
निरोगी जीवनशैलीसाठी (For a healthy lifestyle) स्वत: ची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. आजकाल व्यस्त जीवनात तुम्ही स्वतःची काळजी घेण्यास दुर्लक्ष करतात. आपण प्रत्येक काम खूप मेहनत आणि वेळ देऊन करतो. पण, जेव्हा स्वतःची काळजी घ्यावी लागते तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. यामुळे नंतर अनेक समस्या निर्माण होतात. यामुळे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक समस्यांनाही (Mental problems ) सामोरे जावे लागते. त्याचाही वाईट परिणाम आपल्या नात्यावर होतो. अशा स्थितीत स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. बदलत्या जीवनशैलीत तर, स्वत:ची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. हे आपल्याला निरोगी आणि आनंदी ठेवते. यासाठी दरवर्षी 24 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय सेल्फ केअर डे (International Self Care Day) साजरा केला जातो. जाणून घ्या, या दिवसाचा उत्सव कधीपासून सुरू झाला आणि या दिवसाचे महत्त्व काय आहे.
24 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय सेल्फ केअर डे साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश स्वत: ची काळजी घेणे हा आहे. चांगल्या जीवनशैलीसाठी स्वतःची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. आपल्याला शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. या कारणास्तव, आंतरराष्ट्रीय सेल्फ-केअर फाऊंडेशनने 2011 मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. ही यूके स्थित एक धर्मादाय संस्था आहे. या फाउंडेशनचा असा विश्वास आहे की, जेव्हा प्रत्येक व्यक्ती प्रथम स्वतःची काळजी घेते तेव्हा निरोगी समाजाची सुरुवात होते.
कोविड-19 महामारीच्या काळात विषाणूपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, आपल्याला स्वतःची खूप काळजी घ्यावी लागली, यापुढे देखील अशीच काळजी घेणे काळाची गरज आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकस आहार घ्या, व्यायाम करा आणि स्वतःला निरोगी ठावा. त्यामुळे तुमचा अनेक आजारांपासून बचाव होईल.
नकारात्मकतेपासून दूर राहा, निसर्गाच्या जवळ जा, त्वचेची काळजी घ्या, योगासने करा, व्यायाम करा, निरोगी रहा, चांगली आणि गाढ झोप घ्या, जीवनाचा आनंद घ्या, आरोग्य तपासणी करा, पुस्तके वाचा आणि थोडा वेळ एकांतात घालवा.