जेवणावर वरून मीठ टाकायची सवय आहे का? यामुळे शरीरात काय होतं ते जाणून घ्या

Excess salt effects : जेवणात मीठ योग्य प्रमाणात पडलं नाही तर जेवण बेचव होतं. अनेकदा जेवणात मीठ नसलं की वरून टाकलं जातं. पण जेवणावर मीठ वरून टाकलं तर शरीरावर काय परिणाम होऊ शकतात?

जेवणावर वरून मीठ टाकायची सवय आहे का? यामुळे शरीरात काय होतं ते जाणून घ्या
जेवणावर वरून मीठ टाकायची सवय आहे का? यामुळे शरीरात काय होतं ते जाणून घ्या
Image Credit source: BROKER/Oleksandr Latkun/Getty Images
| Updated on: Jul 31, 2025 | 4:26 PM

भारतात जेवणाचे अनेक प्रकार तयार केले जातात. त्यामुळे भारतीय जेवणाबाबत विदेशी नागरिकांना कायम कुतुहूल राहिलं आहे. भारतीय नागरिकांना आपल्या जेवणात योग्य प्रमाणात मीठ हवं असतं. नाही तर जेवण अळणी किंवा अति खारट होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक पदार्थात मीठाचं प्रमाण योग्य असणं आवश्यक आहे. भाजी असो की वरण, चटणी असो की कोशिंबीर प्रत्येक पदार्थात मीठ त्या त्या प्रमाणात टाकावं लागतं. कधी कधी जेवणात मीठ कमी असलं की वरून टाकून त्याची चव व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक जण जेवण समोर आलं की त्यावर थोडं तरी मीठ टाकतात. त्यांना तशी सवयच झालेली असते. मी त्या पदार्थात मीठ योग्य प्रमाणात असलं तरी ते तसं करतात. पण या सवयीचा फटका तुमच्या आरोग्याला बसू शकतो. डॉक्टर्स आणि तज्ज्ञांच्या मते पदार्थावर वरून मीठ टाकणं आरोग्यासाठी घातक ठरू शकते. चला जाणून घेऊयात काय ते

गंगाराम हॉस्पिटलमधील वरिष्ठ आहारतज्ज्ञ फरेहा शनम यांच्या मते, कोणत्याही पदार्थावर वरून मीठ टाकणं हे आरोग्यासाठई घातक ठरू शकते. यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. कारण पदार्थावर टाकलेल्या मिठामुळे थेट रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो. दिवसभरात आपल्या शरीराला एक ठराविक मात्रेत सोडियमची गरज असते. पण त्यापेक्षा जास्त सेवन केल्यास आरोग्यासाठी घातक ठरतं.

आहातज्ज्ञ फारेहा शानम आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, पदार्थावर वरून मीठ टाकलं तर रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे लठ्ठपणा निर्माण होऊ शकतो. या शिवाय हृदयरोग आणि मूत्रपिंडाच्या आजारांचा धोका वाढतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगभरातील अनेक लोक आवश्यकतेपेक्षा जास्त मीठ सेवन करतात. तरुणांचे दररोज सोडियमम सेवन करण्याचे प्रमाण हे 4310 मिलीग्राम असून ते 10.78 ग्राम मीठाच्या बरोबर आहे. खरं तर एका तरुणाने दिवसाला 2 हजार मिलीग्रामपेक्षा कमी मीठ खाल्लं पाहीजे. हे मीट एक चमच्याचा बरोबरीने आहे.