
आपण अनेकदा हिंदी चित्रपटांमध्ये ‘डबल रोल’ म्हणजेच एका अभिनेत्याचे दोन वेगळे पात्र पाहिलंय. ‘सीता और गीता’, ‘जुड़वां’, ‘डॉन’ अशा चित्रपटांमध्ये अशा भूमिका नेहमीच चर्चेत राहतात. पण प्रश्न असा निर्माण होतो की, खरंच वास्तवात एखाद्या व्यक्तीचा ‘हमशक्ल’ असतो का? म्हणजे, आपल्या चेहऱ्याची हुबेहूब प्रतिमा असणारा दुसरा कोणी तरी जगात असतो का?
लोककथांमध्ये असं म्हटलं जातं की, जगात आपल्या चेहऱ्यासारखे सात लोक असतात. मात्र, विज्ञान याला थोडा वेगळा दृष्टिकोन देते. विज्ञानानुसार, एकसारखी दिसणारी दोन माणसं पूर्णपणे सारखी असणं जवळपास अशक्य आहे. कारण, प्रत्येक माणसाची शारीरिक रचना, नाक, डोळे, ओठ, कान यांचे आकार, चेहऱ्याचा पोत, त्वचेचा रंग आणि हाडांची रचना हे सर्व वेगवेगळं असतं.
आपल्या चेहऱ्याचा आकार आणि रचना डीएनए म्हणजेच जनुकांद्वारे ठरते. प्रत्येक व्यक्तीचा डीएनए वेगळा असतो, त्यामुळे दोन व्यक्ती एकसारख्या दिसण्याची शक्यता अत्यंत कमी असते. फक्त एकाच अंडीपासून तयार झालेले जुळी मुलं (Identical Twins) हेच असे असतात ज्यांची शारीरिक रचना आणि चेहरा खूप मोठ्या प्रमाणात सारखा असतो.
कधी कधी आपण आपल्या आजूबाजूला, इंटरनेटवर किंवा टीव्हीवर अशा व्यक्तींना पाहतो जे आपल्याला एखाद्या ओळखीच्या व्यक्तीसारखे वाटतात. याला ‘Visual Similarity’ असं म्हटलं जातं. म्हणजे पूर्ण साम्य नसतानाही, डोळ्यांनं पाहताना आपल्याला ते एकसारखे वाटतात.
रॉकफेलर युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ विनरिच फ्रेवाल्ड यांच्या मते, ज्यांचं चेहऱ्याचं रचना सरासरी प्रमाणात असतं, अशा लोकांना हमशक्ल असलेले लोक अधिक सापडतात. पण जर आपण त्यांच्या चेहऱ्याची वैज्ञानिक चाचणी केली, तर फरक स्पष्ट होतो.
आजच्या डिजिटल युगात, फोटोज, सेल्फीज आणि सोशल मीडियामुळे हजारो लोकांचे चेहरे आपल्यापर्यंत पोहोचतात. यामुळे आपल्याला वाटतं की आपण कोणाचा तरी ‘हमशक्ल’ पाहिला आहे. पण यामागे मानसिक भ्रम (psychological impression) असण्याची शक्यता अधिक असते.
विशेषत: AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि फेस रिकग्निशन टेक्नॉलॉजीद्वारे, भविष्यात आपण साम्य असलेल्या चेहऱ्यांमध्ये अधिक स्पष्टपणे तुलना करू शकू.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)