AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आल्याचा चहा पिण्याची तुम्हालाही चटक?, पण थांबा तुम्ही देताय ‘या’ आजारांना आमंत्रण…!

आपल्याकडे चहा प्रेमींची संख्या अतिशय जास्त आहे. थंडीच्या दिवसांत बऱ्याच लोकांना गरमागरम चहा पिणे आवडते.

आल्याचा चहा पिण्याची तुम्हालाही चटक?, पण थांबा तुम्ही देताय 'या' आजारांना आमंत्रण...!
| Updated on: Jan 23, 2021 | 6:27 PM
Share

मुंबई : आपल्याकडे चहा प्रेमींची संख्या अतिशय जास्त आहे. थंडीच्या दिवसांत बऱ्याच लोकांना गरमागरम चहा पिणे आवडते. काही लोकांना ‘बेड टी’ची सवय असते, तर अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी चहा पिण्याची सवय असते. ऋतू किंवा हंगाम कोणताही असो, चहा हा प्रत्येकाच्या घरात नेहमीच असतो.  हिवाळ्यातर अदरक चहा पिणे खूप जणांना आवडते. असे अनेकजण असे आहेत की, त्यांना दिवसांतून 7-8 वेळा चहा घेण्याची सवय आहे. (It is dangerous to drink too much ginger tea)

त्यामध्येही विशेष करून अदरकचा चहा कारण डोक जड पडले किंवा सर्दी असेलतर जास्त करून अदरकचा कडक चहा पिला जातो मग तो दिवसातून किती वेळा पण चालतो मात्र, अदरकच्या चहाचे अतिसेवन शरीरासाठी घातक ठरू शकते. अदरकमध्ये बरेच औषधी गुण आहेत पण जास्त प्रमाणात कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. अदरकचा चहा पिण्यामुळे अतिसार होऊ शकतो. जर तुम्ही जास्त आल्याचा चहा घेत असाल तर ही तुमची सवय अत्यंत चुकीची आहे. ज्या लोकांचा रक्तदाब कमी आहे, त्यांनी आल्याचा चहाचे कमी सेवन करू नये.

अदरक जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे या लोकांना चक्कर व अशक्तपणा जाणवते. जास्त प्रमाणात अदरकचा चहा पिण्यामुळे पोटात अ‍ॅसिड होते, ज्यामुळे पोटात जळजळ होते. त्याचप्रमाणे अदरकचा चहा जास्त प्रमाणात प्याल्याने झोपेची समस्या उद्भवू शकते. रात्री वेळीतर आल्याचा चहा चुकून पण पिऊ नये.

बर्‍याच लोकांना अशी सवय असते की, त्यांना खाल्ल्यानंतर लगेच चहा पिणे आवडते. परंतु यामुळे केवळ आपल्या आरोग्यास हानी पोहचते. वास्तविक, आणणा ग्रहण केल्यानंतर त्यातून शरीराला मिळणारे पोषक घटक लगेच चहा प्यायल्याने शोषल जात नाही, ज्यामुळे बर्‍याच समस्या उद्भवू शकतात. म्हणून खाण्याच्या किमान एक तासानंतर चहा प्या.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(It is dangerous to drink too much ginger tea)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.