
बाजारात अनेक प्रकारचे फेस टोनर मिळतात पण काही असे टोनर आहेत ते केमिकलयुक्त असतात, ज्याच्या वापराने तुम्हाला लगेच फरक दिसतो मात्र काळांतराने मात्र त्वचेच्या समस्या निर्माण होऊ लागतात. त्यामुळे एकेकाळी लोकं फेस टोनर वापरणे टाळत असत कारण ते अल्कोहोल बेस्ड होते. परंतु आता हेच फेस टोनर लोकांच्या त्वचेची काळजी घेण्याच्या दिनचर्येचा अविभाज्य भाग बनले आहे. कारण अल्कोहोल बेस्ड टोनर न वापरता बाजारात उपलब्ध असलेले पाणी बेस्ड आणि नैसर्गिक घटकांचे फेस टोनर सर्वोत्तम आहे.
तर हे फेस टोनर त्वचेला उजळवते आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करते. या लेखात फेशियल टोनर कसे लावायचे आणि तुमच्यासाठी सर्वोत्तम टोनर कसा निवडायचा हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात…
फेशियल टोनर म्हणजे काय?
हे सामान्यतः पाण्यावर आधारित लोशन किंवा टॉनिक असते जे चेहरा स्वच्छ केल्यानंतर आणि मॉइश्चरायझर वापरण्यापूर्वी लावले जाते. जरी हे प्रोडक्ट वॉटर बेस्ड सारखे वाटत असले तरी ते त्वचेला शांत करते आणि मॉइश्चरायझ करते.
टोनर त्वचेवर कशा प्रकारे कार्य करतो?
-चेहऱ्यावरील घाण साफ करते.
-त्वचेला आर्द्रता देते.
-इतर स्किन केअर प्रोडक्ट त्वचेत सहजपणे शोषली जातात.
-त्वचेचे पीएच संतुलन पुन्हा नव्यासारखे करण्यास मदत करते.
स्वतःसाठी टोनर कसा निवडावा?
मुरुमांच्या त्वचेसाठी: अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड आणि बीटा हायड्रॉक्सी ॲसिड असलेले टोनर वापरणे सर्वोत्तम ठरेल. काही टोनरमध्ये सॅलिसिलिक ॲसिड असते , जे हायपरपिग्मेंटेशन आणि ऑइल कंट्रोलसाठी चांगले मानले जाते.
संवेदनशील त्वचेसाठी : जर तुम्हाला त्वचेशी संबंधित काही समस्या असतील, तर जास्त सुगंध, डाई आणि प्रीजरव्हेटिव असलेले टोनर वापरणे टाळा.
प्रौढ त्वचेसाठी: व्हिटॅमिन सी आणि फेरुलिक ॲसिड सारखे अँटीऑक्सिडंट्स असलेले टोनर फायदेशीर ठरू शकतात.
मॉइश्चरायझिंग हायल्यूरॉनिक ॲसिड आणि ग्लिसरीन असलेले टोनर वापरल्याने देखील या प्रकारच्या त्वचेला फायदा होऊ शकतो.
टोनर अशा प्रकारे चेहऱ्यावर लावा
क्लींजर लावल्यानंतर नेहमी टोनर लावा, कारण ते वॉटर बेस्ड असते. बरेच टोनर स्प्रे स्वरूपात येतात, जे थेट चेहऱ्यावर स्प्रे केले जाऊ शकतात.
काही टोनर कापसाच्या साहाय्याने लावण्यासाठी डिझाइन केलेले असतात. फक्त तुमचा चेहरा स्वच्छ करा आणि कापसाच्या मदतीने टोनर लावून पुसून टाका. नंतर चेहरा धुण्याची गरज नाही.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)