6 महिने लिंबांना ताजे आणि रसरशीत ठेवण्यासाठी भन्नाट जुगाड, हातांना..
लिंबू आपल्या निरोगी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. दररोजच्या आहारात लिंबाचा समावेश केला तर आरोग्याच्या समस्या दूर होतील. मात्र, लिंबू फार जास्त काळ ताजे ठेवता येत नाही. एक खास गोष्ट फॉलो केली तर तुम्ही लिंबू फार काळ ताजे ठेऊ शकता.

लिंबू जवळपास लोकांना जेवणात लागते. फक्त जेवणच नाही तर लिंबापासून अनेक गोष्टी तयार होतात. लिंबू शरबत उन्हाळ्यात तर एक वरदानच आहे. पण लिंबाचा एक सिझन असतो, तो सिझन संपल्यानंतर बाजारात लिंबू मिळत नाहीत किंवा खूप जास्त महाग मिळतात. लिंबू जास्तीत जास्त पंधरा दिवस ताजे राहतात. त्यापेक्षा अधिक राहिले तर त्याचा रस कमी होतो. ज्यावेळी लिंबाची मागणी कमी होते, त्यावेळी बाजारात लिंबू खूप महाग मिळते. लिंबाची आवक वाढली की, बाजारात लिंबू अत्यंत स्वस्त दरात मिळतात. पण लिंबू फार काळ टिकत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यातच आता एक असा जुगाड आहे, ज्यामुळे लिंबू सहा महिने ताजी राहतील. लिंबू स्वस्त मिळतात, त्यावेळी लिंबू मोठ्या संख्येने खरेदी करा आणि 6 महिने त्याला ताजेच ठेवा. याकरिता आपल्याला फार काही करण्याची गरज नाही.
लिंबू सहा महिन्यांसाठी वापरण्यााठी स्टोर करायची असतील तर लिंबू स्वच्छ धुवून घ्या. एकदम स्वच्छ धुवा, घाण अजिबात राहिली नाही पाहिजे. लिंबू स्वच्छ धुतल्यानंतर ते कोरडे करून घ्या. त्यानंतर लिंबांना खाण्याचे तेल लावा. हे लक्षात ठेवा की, निंबांना तेल पूर्ण बाजूने लागले पाहिजे. त्यानंतर एक डब्बा घ्या आणि सुती कपड्यामध्ये लिंबू गुंडाळून ठेवा.
डब्ब्याचे झाकन व्यवस्थित बंद करा. जर तुम्हाला काही आठवड्यांसाठी लिंबू चांगली ठेवायची असतील तर तुम्ही सुती कपड्यात त्याला बांधून फ्रीजमध्ये ठेवा. बरेच लोक माहिती नसल्याने लिंबू स्टोर करून ठेवण्यापेक्षा त्याचा रस काढून एका बॉटलमध्ये फ्रीजमध्ये ठेवतात. मात्र, लिंबाच्या रसापेक्षा कधीही लिंबू स्टोर केलेले जास्त फायदेशीर ठरते. लिंबू ताजे साठवून ठेवण्यासाठी हे खास उपाय आहेत.
लिंबामध्ये व्हिटामिन सी जास्त असते. लिंबू खाल्ल्याने व्हिटामिन सीची समस्या दूर होते. शिवाय लिंबू पदार्थांमध्ये टाकल्याने पदार्थांची चव बदलते. त्वचेच्या अनेक समस्यांवर उपाय लिंबू आहे. लिंबू आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दररोज सकाळी उपाशी पोटी लिंबू पाणी पिल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.