AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्री छगन भुजबळांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट; सायबर पोलिसांनी मोठा डाव उधळला

मंत्री छगन भुजबळांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपीचा मोठा डाव उधळला आहे.

मंत्री छगन भुजबळांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट; सायबर पोलिसांनी मोठा डाव उधळला
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 23, 2026 | 1:18 PM
Share

मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात सोशल मीडिया अकाउंटधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांचे वैयक्तिक फोटो डिजिटल पद्धतीने मॉर्फ केले. आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर लिहून सोशल मीडियावर प्रसिद्ध  केल्याचा प्रकार समोर आलाय.

हर्षल खैरनार यांनी दिलेल्या तक्रारीवरून  सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येवला एक्सप्लोरिंग नावाचे एक अकाऊंट दिसून आले. या खात्यावरून छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.

पोस्टमध्ये आक्षेपार्ह मजकूर 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन सिडको येथील रहिवासी हर्षल श्रीधर खैरनार यांनी नाशिक शहर सायबर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली. खैरनार हे नेहमीप्रमाणे इन्स्टाग्रामचा वापर करत होते. त्यावेळी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांचे फोटो बदलून पोस्ट केल्याचे निदर्शनास आले. या फोटोच्या माध्यमातून आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर लिहून छगन भुजबळ यांची प्रतिमा मलिन करण्याचा हेतू असल्याचे तक्रारीत म्हटलं आहे.

सायबर पोलिसांनी आरोपीचा मोठा डाव उधळला 

एका पोस्टमध्ये छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांचे एकत्रित फोटो मॉर्फ करण्यात आले आहेत. अज्ञात आरोपीने 20 नोव्हेंबरआधी इन्स्टाग्रामआधी बोगस खाते तयार केले. त्यानंतर दोघांचे फोटो मोर्फ करून बदनामी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आता या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलिसांकडून कारवाईसाठी हालचाली सुरू झाली आहे. पोलीस आरोपीकडे पोहोचण्याआधीच त्याने  इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केले. त्याने अकाऊंट डिलीट केले तरी, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितापर्यंत पोहोचण्यासाठी सायबर पोलिसांनी पावले उचलली आहेत. त्यामुळे अज्ञात आरोपीचा पलायनाचा डाव देखील उधळला आहे.

Follow Us
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू
आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
Rahul Narvekar on Sanjay Raut : आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले...
Rohit Pawar : शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले सरकार...
अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या....
Super Power India : अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या अहवालात भारताचा दबदबा कायम
योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून
Ladki Bahin Yojana : योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून नरहरी झिरवाळांनी मांडली सरकारची अडचण
निर्णयाशी असहमती म्हणजे संस्थेवर...; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं...
CJI Surya Kant : निर्णयाशी असहमती म्हणजे संस्थेवर प्रश्नचिन्ह नव्हे; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं महत्त्वपूर्ण विधान, नेमकं काय म्हणाले? 
बिसलेरीचं पाणी खरंच असुरक्षित? FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी....
Bisleri : बिसलेरीचं पाणी खरंच असुरक्षित? FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी; कंपनीने काय दिलं स्पष्टीकरण
13 वर्षांची प्रतीक्षा संपणार; NSEL प्रकरणात 1,950 कोटींच्या परताव्याचा
NSEL Scam : 13 वर्षांची प्रतीक्षा संपणार; NSEL प्रकरणात 1,950 कोटींच्या परताव्याचा मोठा निर्णय
सोनं महागलं, चांदीचे दर जैसे थे; सोन्याच्या तोळ्यामागे एवढ्या रुपयांची
Gold Sliver Price Today : सोनं महागलं, चांदीचे दर जैसे थे; सोन्याच्या तोळ्यामागे एवढ्या रुपयांची वाढ, खरेदीदारांना धक्का
आदिवासींची घरे पाडली, राहुल नार्वेकर यांच्यावर जमिनी लाटल्याचा आरोप...
Sanjay Raut on Rahul Narwekar : आदिवासींची घरे पाडली, राहुल नार्वेकर यांच्यावर जमिनी लाटल्याचा आरोप; संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र