AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : मॅच जिंकता आली नाही म्हणून शुबमन गिलकडून वेलिंगटनच्या पीचवर प्रश्नचिन्ह आता दुसऱ्या टेस्टसाठी खास डिमांड

IND vs NZ : भारत-न्यूझीलंडमध्ये टेस्ट सीरीजचा दुसरा आणि शेवटचा सामना 27 नोव्हेंबरपासून क्राइस्टचर्चमध्ये खेळला जाणार आहे. पहिल्या टेस्ट नंतर शुबमन गिलला विचारण्यात आलं की, कुठल्या क्षेत्रात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

IND vs NZ : मॅच जिंकता आली नाही म्हणून शुबमन गिलकडून वेलिंगटनच्या पीचवर प्रश्नचिन्ह आता दुसऱ्या टेस्टसाठी खास डिमांड
shubman gill Image Credit source: AFP
| Updated on: Nov 23, 2026 | 1:04 PM
Share

वेलिंगटन टेस्ट मॅच मध्ये भारतीय फलंदाजांनी शानदार प्रदर्शन केलं. मात्र तरीही सामना ड्रॉ झाला. आता दुसऱ्या टेस्टमध्ये कॅप्टन शुबमन गिलची नजर पीचवर आहे. क्राइस्टचर्च हेगले ओवलमध्ये गोलंदाजांना काही मदत मिळाली तर टीम इंडियाला आपली आघाडी निकालात बदलता येईल. भारत-न्यूझीलंडमध्ये टेस्ट सीरीजचा दुसरा आणि शेवटचा सामना 27 नोव्हेंबरपासून क्राइस्टचर्चमध्ये खेळला जाणार आहे. पहिल्या टेस्ट नंतर शुबमन गिलला विचारण्यात आलं की, कुठल्या क्षेत्रात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. त्यावर त्याने क्राइस्टचर्चची पीच जास्त गोलंदाजी अनुकूल राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.

“प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास मला जास्त काही अपेक्षा नाहीयत. क्राइस्टचर्चच्या पीचकडून गोलंदाजांना थोडी जास्त मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. तिथे सुद्धा आम्ही असेच खेळलो. फलंदाजी आणि गोलंदाजीच्या योजनांची योग्य पद्धतीने अमलबजावणी केली, तर आम्ही चांगल्या स्थितीत राहू” असं शुबमन गिल म्हणाला.

शतक अवघ्या दोन धावांनी हुकलं

वेलिंगटन कसोटीत टीम इंडियाने आपला पहिला डाव नऊ विकेट गमावून 720 धावांवर घोषित केला. केएल राहुलने 136 आणि ऋषभ पंतने 128 धावा केल्या. शुबमन गिलचं शतक अवघ्या दोन धावांनी हुकलं. यशस्वी जैस्वालने 85, देवदत्त पडिक्कलने 80 आणि ध्रुव जुरेलने 78 रन्स केल्या. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचा पहिला डाव 368 धावात गुंडाळला.

न्यूझीलंडचे फलंदाज ठामपणे खेळले

शुबमन गिलने परदेशी ग्राऊंडवर हे चांगलं प्रदर्शन असल्याचं सांगितलं. भारताने न्यूझीलंडपेक्षा सरस गोलंदाजी केली. फलंदाजांनी मिळून चांगल्या धावा उभारल्या.पहिल्या डावात न्यूझीलंडने एकवेळ 70 धावांवर पाच विकेट गमावले होते. पण भारतीय गोलंदाज हा दबाव कायम राखू शकले नाहीत. दुसऱ्या इनिंगमध्ये न्यूझीलंडचे फलंदाज ठामपणे खेळले. दुसऱ्या इनिंगमध्ये न्यूझीलंडने पाच विकेट गमावून 239 धावा केल्या होत्या. दोन्ही टीम्सनी ही मॅच ड्रॉ केली.

आयसीसीच्या त्या नियमावर निशाणा साधला

ICC ने 2020 साली कोरोना संकटकाळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेंडूला लाळ लावण्यावर बंदी घातली होती. कोविड संकटादरम्यान बनवलेला तो नियम ICC ने सप्टेंबर 2022 मध्ये कायम ठेवत कायमसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बंदी घातली. शुबमन गिलने वेलिंगटन टेस्ट ड्रॉ झाल्यावर आयसीसीच्या त्या नियमावर निशाणा साधला आहे.

Follow Us
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू
आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
Rahul Narvekar on Sanjay Raut : आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले...
Rohit Pawar : शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले सरकार...
अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या....
Super Power India : अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या अहवालात भारताचा दबदबा कायम
योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून
Ladki Bahin Yojana : योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून नरहरी झिरवाळांनी मांडली सरकारची अडचण
निर्णयाशी असहमती म्हणजे संस्थेवर...; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं...
CJI Surya Kant : निर्णयाशी असहमती म्हणजे संस्थेवर प्रश्नचिन्ह नव्हे; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं महत्त्वपूर्ण विधान, नेमकं काय म्हणाले? 
बिसलेरीचं पाणी खरंच असुरक्षित? FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी....
Bisleri : बिसलेरीचं पाणी खरंच असुरक्षित? FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी; कंपनीने काय दिलं स्पष्टीकरण
13 वर्षांची प्रतीक्षा संपणार; NSEL प्रकरणात 1,950 कोटींच्या परताव्याचा
NSEL Scam : 13 वर्षांची प्रतीक्षा संपणार; NSEL प्रकरणात 1,950 कोटींच्या परताव्याचा मोठा निर्णय
सोनं महागलं, चांदीचे दर जैसे थे; सोन्याच्या तोळ्यामागे एवढ्या रुपयांची
Gold Sliver Price Today : सोनं महागलं, चांदीचे दर जैसे थे; सोन्याच्या तोळ्यामागे एवढ्या रुपयांची वाढ, खरेदीदारांना धक्का
आदिवासींची घरे पाडली, राहुल नार्वेकर यांच्यावर जमिनी लाटल्याचा आरोप...
Sanjay Raut on Rahul Narwekar : आदिवासींची घरे पाडली, राहुल नार्वेकर यांच्यावर जमिनी लाटल्याचा आरोप; संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र