फक्त 1 हजारात हा सुंदर देश संपूर्ण फिरून या, सगळंच इतकं स्वस्त की तुम्हालाही बसेल धक्का

परदेशात फिरायला जायचं असं अनेकांच स्वप्न असतं पण अनेकदा पैशांमुळे ते शक्य होत नाही, परदेशात फिरायला जायचं म्हणजे तुमच्या खिशात कमीत कमी दोन ते तीन लाखांपेक्षा अधिक पैसे हवेत, तर तुम्ही परदेश वारीचा प्लॅन बनवू शकता, मात्र आज आम्ही तुम्हाला अशा देशाबद्दल सांगणार आहोत, जो देश खूपच स्वस्त आहे.

फक्त 1 हजारात हा सुंदर देश संपूर्ण फिरून या, सगळंच इतकं स्वस्त की तुम्हालाही बसेल धक्का
प्रवास
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Nov 21, 2025 | 6:40 PM

अनेक जण परदेश वारीचा बेत बनवतात, मनामध्ये सर्व प्लॅनिंग करतात आणि नंतर तो रद्द करतात, प्रत्येकाची इच्छा असते की आयुष्यात एकदा तरी परदेशात पर्यटनासाठी जायचं, पण ते प्रत्येकालाच जमतं असं नाही, अनेकदा पैशांची अडचण असते, तर कधी वेळेची समस्या. परदेशात फिरण्यासाठी जायचं म्हणचे तुमच्या खिशात लाखो रुपये असावे लागतात, तुम्हाला त्यासाठी व्हिसा, पासपोर्ट या सर्व गोष्टींची गरज पडते, पण जर तुमच्याकडे कमी पैसे आहेत, तरीही तुम्हाला परदेश वारी करायची आहे तर काळजी करू नका आज आम्ही तुम्हाला अशा देशाबद्दल माहिती सांगणार आहोत, जो देश सुंदर तर आहेच, परंतु सर्वात स्वस्त देखील आहे, येथील पर्यटन स्थळं, पर्यटकांना भुरळ घालणारी संस्कृती, तेथील खाण-पाण सर्वच तुम्हाला नक्की आवडेल, चला तर आपण या देशाबद्दल माहिती घेऊयात.

हा देश दुसरा तिसरा कोणता नसून तो देश आहे इराण, इराणमध्ये सर्वच वस्तू या प्रचंड स्वस्त आहेत. राहण्यापासून तर खाण्याच्या खर्चापर्यंत इथे सर्वच गोष्टी तुम्हाला अगदी स्वस्तात उपलब्ध होतात, इथे -चांगल्या -चांगल्या थ्री स्टार आणि फाईव्ह स्टार हॉटेलचे दर देखील तुमच्या खिशाला परवडणारे आहेत. सर्वच गोष्टी स्वस्त असल्यामुळे तुम्ही आरामात अगदी कमी खर्चामध्ये हा देश फिरून येऊ शकतात.

एवढं स्वस्त का?

इराणमध्ये एवढं सर्व स्वस्त का असा प्रश्न आता तुम्हालाही पडला असेल, तर त्याचं हे देखील एक कारण आहे, जेव्हा आपण अमेरिकेत फिरायला जातो, तेव्हा आपल्याला ते प्रचंड खर्चिक वाटतं. कारण डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य हे खूप कमी आहे. मात्र इराणच्या करन्सीच्या तुलनेत रुपयाचं मूल्य हे खूप अधिक आहे. भारताच्या एक रुपयाची किंमत इराणमध्ये तब्बल 475 इराणी रियाल एवढी होते, त्यामुळे इराणमध्ये फिरण्यास जास्त खर्च होत नाही, तसेच तुम्ही तुमचं परदेश वारीचं स्वप्न देखील पूर्ण करू शकता. इराणमध्ये अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत, ज्यांना तुम्ही भेट देऊ शकता.