AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही सुद्धा ‘या’ चुकीच्या वेळी चहा घेत आहात का? तर थांबा अन्यथा आरोग्याला पोहोचवू शकते नुकसान

चहा हे आपल्या भारतात एक लोकप्रिय पेय आहे पण चुकीच्या वेळी ते पिणे हानिकारक ठरू शकते. आयुर्वेद तज्ञांच्या मते चुकीच्या वेळी चहा पिणे तुम्हाला अनेक प्रकारे आरोग्यास नुकसान पोहोचवू शकते. म्हणून, ते पिण्याची योग्य वेळ जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. चहा पिण्याची योग्य आणि अयोग्य वेळ कोणती आहे ते आपण आजच्या या लेखात जाणून घेऊया.

तुम्ही सुद्धा 'या' चुकीच्या वेळी चहा घेत आहात का? तर थांबा अन्यथा आरोग्याला पोहोचवू शकते नुकसान
teaImage Credit source: Freepik
| Edited By: | Updated on: May 28, 2025 | 3:07 PM
Share

जगभरातील लोकं मोठ्या आवडीने चहा पितात. विशेषतः आपल्या भारतात चहाप्रेमींची कमतरता नाही. कोणत्याही ऋतूत आणि कोणत्याही वेळी चहा प्रेमी चहा पित असतात. त्यात प्रत्येकांची दिवसाची सुरुवात एक चहाने होत असते. तर दिवसाचा शेवटही चहाच्या कपानेच होते, मात्र जास्त चहा पिणे आरोग्यास देखील नुकसान पोहोचवू शकते. चहा प्यायल्याने मूड ताजेतवाने होत असला तरी, त्याचे तात्पुरते फायदे असले तरी, ते अनेक तोटे देखील घेऊन येते. विशेषतः जर तुम्ही ते चुकीच्या वेळी प्यायले तर ते निश्चितच तुमच्या आरोग्यास नुकसान करू शकते. म्हणून, आयुर्वेद तज्ञांनी चहा पिण्याची योग्य आणि चुकीची वेळ सांगितली. चला तर मग आजच्या या लेखात आपण चहा पिण्याची योग्य आणि अयोग्य वेळ जाणून घेऊया…

चहा पिण्याची सर्वात अयोग्य वेळ कोणती आहे?

– चहा कधीही रिकाम्या पोटी पिऊ नये, कारण यामुळे तुमच्या शरीरातील कॉर्टिसॉल वाढू शकतो, जळजळ वाढू शकते आणि कालांतराने अल्सर देखील होऊ शकतात.

– रात्री झोपण्यापूर्वी 8-10 तास आधी चहा अजिबात पिऊ नये. कारण यामुळे तुमची झोप बिघडू शकते आणि चिंता, निद्रानाशाच्या समस्या वाढू शकतात.

– जर तुम्हाला अ‍ॅसिडिटीची समस्या असेल तर या काळात चहा पिणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. खरं तर चहाचे स्वरूप आम्लयुक्त असते आणि म्हणूनच ते प्यायल्याने छातीत जळजळ होऊ शकते.

– जेवणापूर्वी किंवा नंतर चहा पिणे देखील टाळावे. कारण चहामुळे पोषक तत्वे शोषण्याची क्षमता कमी होऊ शकते.

– चहामधील टॅनिन लोह शोषणात व्यत्यय आणू शकतात. हे टॅनिन लोहाशी बांधले जातात, ज्यामुळे शरीराला ते शोषणे कठीण होते. म्हणून, लोह पूरक आहार घेतल्यावर चहा पिणे टाळावे.

चहा पिण्याची सर्वोत्तम वेळ

आता तुम्ही विचार करत असाल की, जर चहा पिण्याच्या सर्व वेळा चुकीच्या असतील, तर त्यासाठी योग्य वेळ कोणती? डॉक्टरांनी चहा पिण्याची योग्य वेळ देखील सांगितली आहे, ज्याचे पालन करून तुम्ही चहाचा आनंद घेऊ शकाल आणि त्यामुळे तुमचे नुकसान होणार नाही. चहा पिण्याची योग्य वेळ कोणती आहे ते आपण जाणून घेऊयात.

तुम्ही सकाळी उठल्यानंतर 1-2 तासांनी चहा पिऊ शकता. शक्यतो दुपारी 12 वाजण्याआधी चहा प्यावा. अशातच नाश्त्यात नट्स आणि सीड्स खाल्ल्यानंतरच चहा प्या.

ज्या लोकांचे कामाची वेळ ही रात्रीच्या शिफ्टमध्ये असते अशा लोकांनी रात्रीच्या वेळेस वेळेत अंतर ठेऊन चहा पिऊ शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत