Benefits of Clove Oil : लवंग तेलाचे आश्चर्यकारक फायदे, वाचा!

| Updated on: Jul 14, 2021 | 4:31 PM

लवंग हा एक फायदेशीर मसाला आहे. आयुर्वेदात याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हे आरोग्याच्या अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करते.

Benefits of Clove Oil : लवंग तेलाचे आश्चर्यकारक फायदे, वाचा!
लवंगचे तेल
Follow us on

मुंबई : लवंग हा एक फायदेशीर मसाला आहे. आयुर्वेदात याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हे आरोग्याच्या अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करते. दातदुखीपासून आराम मिळविण्यासाठी लवंगाचा वापर केला जातो. मात्र, तुम्हाला हे माहीती आहे का? की, आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी लवंगचे तेल अत्यंत फायदेशीर आहे. (Clove Oil is beneficial for health)

-डोकेदुखीची समस्या दूर करण्यासाठी लवंगचे तेल अतिशय फायदेशीर आहे. लवंगच्या तेलामध्ये विरोधी दाहक गुणधर्म आहेत जे जळजळ कमी करण्यास मदत करतात. या व्यतिरिक्त, हे वेदनादायक भागात लावल्याने त्रास कमी होण्यास मदत होते. यासाठी, चिमूटभर मीठात लवंग तेलाचे काही थेंब मिसळावे.

-लवंग आणि तिळाचे तेल मिक्स करून केसांना लावल्याने केसांना बरेच फायदे होतील. केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी आपण दोन चमचे लवंग तेल, दोन चमचे तिळाचे तेल आणि खोबरेल तेल मिक्स करून केसांना लावा.

-लवंग शरीरातील वेदना कमी करण्याचे काम करते. जर आपल्याला दात दुखण्याची समस्या असेल तर लवंगच्या तेलापेक्षा काहीच चांगले नाही. दात दुखत असती तर त्याठिकाणी लवंगचे तेल लावा. यामुळे लवकरच आराम मिळेल. याशिवाय आपण आर्थरायटिस, डोकेदुखी इत्यादी समस्यांपासून मुक्त होण्यासाठी लवंगच्या तेलाचा वापर करू शकतो.

-लवंगेचे तेल पाण्यापेक्षा जड असते. लवंग तिखट, कडू रसाची असून लघु गुणांची म्हणून डोळय़ांना हितकारक आहे. पाचक व रुची उत्पन्न करणारी प्रामुख्याने कफ विकारावर व काही प्रमाणात पित्त व कफ विकारावर लवंगचे तेल काम करते.

-बहुतेक लोकांना हाडांची समस्या असते, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो. ऑस्टियोपोरोसिसमुळे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. अभ्यासानुसार लवंगामध्ये आढळणारे युजेनॉल हाडांची घनता वाढवते आणि त्यांना बळकट करते. लवंगामधील मॅंगनीझ हाडांमध्ये रचनात्मक विकास करते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Clove Oil is beneficial for health)