AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑफिसच्या पानचट चहाला करा बाय-बाय! अशा पद्धतीने घरच्या घरी बनवा प्रीमिक्स पावडर

कामाचा थकवा दूर करायचा असेल, तर चहा हवाच! आणि तोही अस्सल चव असलेला. म्हणूनच आजच बनवा ही घरगुती चहा प्रीमिक्स पावडर आणि ऑफिसच्या पानचट चहाला बाय-बाय करा...

ऑफिसच्या पानचट चहाला करा बाय-बाय! अशा पद्धतीने घरच्या घरी बनवा प्रीमिक्स पावडर
Tea MasalaImage Credit source: freepik/pixabay
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: Sanjay patil | Updated on: Jul 03, 2025 | 5:22 AM
Share

ऑफिसमध्ये काम करताना चहा लागणं ही अगदी सामान्य गोष्ट आहे. मानसिक थकवा, कामाचा ताण किंवा मिटिंगच्या आधी थोडा फ्रेश होण्यासाठी एक कप चहा हवीच असते. पण बऱ्याच कार्यालयांमध्ये मिळणाऱ्या चहा इतकी वाईट चव असते की, ती प्यायची इच्छा होत नाही. केवळ पाणच असतं, चहा पत्तीचा स्वाद नसतो, आणि दूधाचा पत्ता नसतो. अशा चहा ऐवजी आपण घरच्या घरी एक खास झटपट तयार होणारी चहा प्रीमिक्स पावडर तयार करू शकतो.

ही पावडर तुम्ही एका वेळेस तयार करून एअरटाइट डब्यात भरून ठेवू शकता. मग ऑफिसमध्ये कधीही गरम पाण्यात 2 चमचे मिसळा आणि तयार होईल एकदम टेस्टी आणि ताजगीदायक चहा. चला तर मग पाहूया ही प्रीमिक्स पावडर बनवायची सोपी पद्धत.

काय लागेल चहा प्रीमिक्ससाठी?

  1. अर्धा कप चहा पावडर (मिक्सरमध्ये बारीक करून घ्या)
  2. 1 कप मिल्क पावडर
  3. अर्धा कप साखर (तुमच्या चवीनुसार आणि तीही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या)
  4. 1 चमचा सुकं आलं पावडर
  5. 1 चमचा वेलदोडा पावडर
  6. हवं असल्यास थोडंसं दालचिनी पावडर

कशी कराल तयारी?

सर्वप्रथम, बारीक केलेली चहा पावडर आणि साखर एकत्र एका मोठ्या बाऊलमध्ये घ्या. त्यात मिल्क पावडर, आले पावडर, वेलदोडा पावडर आणि हवं असल्यास दालचिनी पावडर घालून सगळं चांगलं मिक्स करा. सर्व साहित्य एकसंध मिसळल्यावर हे मिश्रण एका एअरटाइट कंटेनरमध्ये भरून ठेवा.

ही चहा प्रीमिक्स पावडर 15 ते 20 दिवस टिकते आणि तिचा स्वादही जसाच्यातसा राहतो. आता जेव्हा जेव्हा ऑफिसमध्ये चहा प्यायची इच्छा होईल, तेव्हा फक्त 1 कप गरम पाण्यात 2 चमचे ही प्रीमिक्स पावडर मिसळा, नीट ढवळा आणि तुमचा घरगुती, टेस्टी चहा तयार!

सोपं, झटपट आणि अत्यंत उपयोगी!

या चहा प्रीमिक्सचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता. ऑफिसमध्ये, प्रवासात, कॅम्पिंगला किंवा अगदी लाँग मिटिंगमध्ये – फक्त गरम पाणी असलं की तुमचा आवडता चहा तयार! यामुळे ऑफिसमधील चवहीन चहापासून सुटका होईल आणि ताजगी कायम राहील.

चहा प्रेमींनी ही घरगुती रेसिपी एकदा नक्कीच करून बघावी. ही पावडर बनवायला कमी वेळ लागतो आणि खर्चही कमी. यामुळे तुमच्या ऑफिसमधील प्रत्येक दिवस होईल चवदार आणि ऊर्जावान!

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?