Weight Loss : ‘हे’ दालचिनीचे खास पेय दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्या आणि वजन कमी करा!

| Updated on: Nov 06, 2021 | 11:32 AM

दालचिनी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दालचिनीचे अनेक आयुवैर्दिक गुणधर्म आहेत. त्यातील प्रमुख गुणधर्म म्हणजे दालचिनी खाण्यामुळे शरिरातील साखरेचे प्रमाण झपाट्याने कमी करण्यास मदत होते. यामुळे अनेक पदार्थांमध्ये दालचिनीचा समावेश केला जातो.

Weight Loss : हे दालचिनीचे खास पेय दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्या आणि वजन कमी करा!
Weight Loss
Follow us on

मुंबई : दालचिनी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दालचिनीचे अनेक आयुवैर्दिक गुणधर्म आहेत. त्यातील प्रमुख गुणधर्म म्हणजे दालचिनी खाण्यामुळे शरिरातील साखरेचे प्रमाण झपाट्याने कमी करण्यास मदत होते. यामुळे अनेक पदार्थांमध्ये दालचिनीचा समावेश केला जातो. कोरोनाच्या काळामध्ये आपल्या शरीराच्या हालचाली खूप कमी झाल्या. यामुळे वजन झपाट्याने वाढले. जर आपल्याला ही वाढलेले वजन कमी करायचे असेल तर आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी दालचिनीचे खास पेय घेतले पाहीजे.

हे खास पेय घरी तयार करण्यासाठी आपल्याला दालचिनी पावडर, मध, लिंबू आणि आवळा पावडर लागणार आहे. एक चमचा दालचिनी पावडर एक ग्लास पाण्यात उकळा. त्यात अर्ध लिंबू, आवळा पावडर आणि एक चमचा मध मिसळून ते गाळून घ्या आणि चहासारखे प्या. हे पेय तुमचे चयापचय सुधारण्यास मदत करते आणि झटपट वजन कमी करते. मात्र, हे पेय दररोज सकाळी रिकाम्या पोटी एकच ग्लास घ्या. दिवसातून इतरवेळा हे पेय पिणे टाळा.

आपण मधुमेहाचे रुग्ण असल्यास आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवू इच्छित असल्यास आपण या सोप्या मार्गाने दालचिनी वापरू शकता. यासाठी तीन चमचे दालचिनी पावडर एक लिटर पाण्यात 20 मिनिटे उकळवा. त्यानंतर संपूर्ण दिवसभर हे पाणी प्या. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. दालचिनी हा असा मसाला आहे जो आपल्या अन्नामध्ये सुगंध जोडण्याबरोबरच त्याची चवही वाढवतो.

दालचिनीमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म आहेत, त्यामुळे ते रोग दूर होण्यास मदत मिळते. आयुर्वेदातही याचा वापर केला जातो. दालचिनी नैसर्गिकरित्या इन्सुलिनची पातळी राखण्याचे काम करते. तसेच साखरेची पातळी राखण्यास मदत होते. दालचिनी हा सुगंधी मसाला चयापचय सुधारण्यास मदत करतो आणि जे वजन कमी करण्यास देखील फायदेशीर आहे.

संबंधित बातम्या : 

सावधान! तुमच्या औषधांच्या पाकिटावरही ‘लाल रेघ’ आहे? जाणून घ्या तिचा नेमका अर्थ…

Jaggery Health Benefits | गुळाचे हे फायदे जाणाल… तर रोज गूळ खाल!

(Drink this cinnamon drink on an empty stomach every morning and lose weight)