Health Tips | निरोगी राहण्यासाठी आहारासंबंधित ‘या’ 5 टिप्स नक्की पाळा, नेहमी राहाल तंदुरुस्त!

| Updated on: Sep 14, 2021 | 12:01 PM

आपल्या सर्वांना निरोगी आणि आरोग्यदायी खाण्याबद्दल माहिती आहे. अनेक सेलेब्स आणि पोषणतज्ज्ञांनी निरोगी आणि पौष्टिक आहाराचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. या व्यतिरिक्त, काही अभ्यासांमध्ये असे सांगितले गेले आहे की, पौष्टिक आहाराचे पालन केल्याने खराब जीवनशैलीमुळे होणारे रोग कमी होण्याची शक्यता असते.

Health Tips | निरोगी राहण्यासाठी आहारासंबंधित ‘या’ 5 टिप्स नक्की पाळा, नेहमी राहाल तंदुरुस्त!
Health Tips
Follow us on

मुंबई : आपल्या सर्वांना निरोगी आणि आरोग्यदायी खाण्याबद्दल माहिती आहे. अनेक सेलेब्स आणि पोषणतज्ज्ञांनी निरोगी आणि पौष्टिक आहाराचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. या व्यतिरिक्त, काही अभ्यासांमध्ये असे सांगितले गेले आहे की, पौष्टिक आहाराचे पालन केल्याने खराब जीवनशैलीमुळे होणारे रोग कमी होण्याची शक्यता असते. यासह, टाईप-2 मधुमेह, लठ्ठपणा इत्यादी कमी करता येतात. तथापि, स्वच्छ आणि निरोगी जीवनशैली सुरू करणे थोडे कठीण काम असू शकते.

जर, तुम्ही पहिल्यांदा निरोगी जीवनशैली पाळायला सुरूवात करत असाल आणि काय खावे आणि कोणते खाणे टाळावे, हे माहित नसेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला निरोगी आणि पौष्टिक आहार सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करून आपण नेहमी हेल्दी आणि फिट राहू शकता.

फळे आणि भाज्या खा

आपल्या सर्वांना माहित आहे की, हंगामी फळे आणि भाज्या 2 ते 3 वेळा तरी खाव्यातच, त्यात भरपूर पोषक घटक असतात आणि रोगांपासून आपले संरक्षण करण्यास मदत करतात. जर, तुम्ही निरोगी आहार तत्त्वांचे पालन केले, तर पहिला नियम म्हणजे तुमच्या आहारात अधिक नैसर्गिक गोष्टी असणे. फक्त फळे आणि भाज्या पोषक नसतात. हे घटक अँटी-ऑक्सिडंट्स, खनिजे, कार्बोहायड्रेट, प्रथिने, फायबर समृध्द असावेत. या गोष्टी खाल्ल्याने कोलेस्टेरॉल, टाईप-2 मधुमेहाचा धोका कमी होतो. हंगामी फळे आणि भाज्यांमध्ये रसायन कमी असण्याची शक्यता असते.

माफक प्रमाणात मांस खा

काही अभ्यासात असे आढळून आले आहे की, मांसाचे सेवन कमी करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मांसाचे सेवन कमी केले पाहिजे, विशेषतः वनस्पती-आधारित आहारांमध्ये. हे पाऊल केवळ आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही, तर पर्यावरणासाठी देखील चांगले आहे. आपल्या आहारात फायबर युक्त गोष्टी खा, ज्याची शरीराला सर्वात जास्त गरज आहे. शरीराच्या पौष्टिक गरजा मांसाहाराशिवाय देखील सहजपणे पूर्ण केल्या जाऊ शकतात.

अधिक धान्य खा

जेव्हा तुम्ही पौष्टिक आहार खाण्याचा विचार करता, तेव्हा तुम्ही तुमच्यासाठी योग्य धान्य निवडणे महत्वाचे आहे आणि तुम्ही जे काही खात आहात ते रासायनिक मुक्त, संरक्षकांपासून मुक्त असावे याची खात्री करा. म्हणूनच निरोगी गोष्टींमध्ये अन्नधान्याचे नाव प्रथम येते, कारण त्यात कमीतकमी रासायनिक-समृद्ध गोष्टी वापरल्या जातात. धान्य पूर्णपणे नैसर्गिक असते. आपण संपूर्ण धान्यांमध्ये इतर गोष्टींबरोबर ओट्स, क्विनोआ समाविष्ट करू शकता, जे पचन आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करतात. यासह, हे वजन कमी करण्यास देखील मदत करतात.

प्रक्रिया केलेले अन्न आणि रिफाइंड कार्ब्स टाळा

आपल्या आहारात रिफाइंड कार्ब्स आणि प्रक्रिया केलेल्या गोष्टी कमी केल्या पाहिजेत. आपल्या आहारात जंक फूड आणि पॅकेज असलेले अन्न सेवन करणे कमी करा. बहुतेक पॅकेज्ड असलेल्या फळांचा रस आणि जंक फूडमध्ये अनेक प्रकारचे संरक्षक टाकले जातात. या गोष्टींमध्ये कॅलरीज जास्त आणि पोषक तत्व खूप कमी असतात.

कमी सोडियम आणि साखरयुक्त पदार्थ खा

निरोगी जीवनशैलीसाठी, आपल्या आहारात रिफाइंड साखर, सोडियम आणि साखरयुक्त गोष्टी मर्यादित प्रमाणात ठेवा. बिस्किट, चिप्स, ब्रेडमध्ये साखर आणि सोडियम असते, जे आरोग्यासाठी हानिकारक असतात, हे बहुतेक लोकांना माहित नसते. या व्यतिरिक्त, पेय, सोडा, मिठाई, खाण्यासाठी तयार गोष्टींचा वापर कमी करा. त्याऐवजी, नैसर्गिक गोडवा असलेली फळे आणि इतर पदार्थ खा.

हेही वाचा :

Skin Care : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी बदामाचा अशाप्रकारे वापरा करा आणि सुंदर त्वचा मिळवा!

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी ‘हे’ 5 मसाले आहारात समाविष्ट करा!