Recipe: दुपारचा भात उरला? फेकू नका, बनवा क्रिस्पी टिक्की, संध्याकाळच्या चहाची मजा होईल डबल

Recipe : दुपारच्या जेवणात भात उरला असेल तर टाकून देऊ नका. त्यापासून टेस्टी आणि क्रिस्पी टिक्की बनवू शकता. संध्याकाळच्या चहासोबत खायला सगळ्यांना आवडेल.

Recipe: दुपारचा भात उरला? फेकू नका, बनवा क्रिस्पी टिक्की, संध्याकाळच्या चहाची मजा होईल डबल
Photo - Magnific (formerly Freepik)
| Edited By: | Updated on: Oct 07, 2026 | 6:09 PM

अनेक वेळा दुपारच्या जेवणात भात शिल्लक राहतो. अशा वेळी तो भात रात्री जेवणात न घेता तो फेकून दिला जातो. तुम्हाला सुद्धा सकाळचा भात रात्री खायला आवडत नसेल तर तो फेकू नका, तुम्ही या रेसिपीने त्याला ट्विस्ट देऊ शकता. उरलेल्या भातापासून तुम्ही क्रिस्पी टिक्की बनवू शकता. विशेष म्हणजे ही चविष्ट टिक्की बनवण्यासाठी तुम्हाला भरपूर गोष्टींची गरज नाही. तर दुपारच्या जेवणात उरलेल्या भात आणि घरात सहज उपलब्ध असणाऱ्या थोड्या साहित्यात ही रेसिपी तयार करता येते. ही टिक्की खायला जेवढी चटपटीत, कुरकुरीत आहे तेवढीच बनवायलाही सोपी आहे. तुम्ही ही टेस्टी टिक्की संध्याकाळच्या चहासोबत सर्व्ह करू शकता. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घ्या उरलेल्या भातापासून क्रिस्पी टिक्कीची रेसिपी.

साहित्य

Loading...

उरलेल्या भाताची टिक्की बनवण्यासाठी तुम्हाला २ वाट्या शिजवलेला भात,१ वाटी रवा, १ चिरलेला कांदा, १ चिरलेला गाजर, २ टीस्पून उकडलेले आणि मॅश केलेले हिरवे वाटाणे, १ उकडलेला बटाटा, २ हिरव्या मिरच्या, १ चमचा लाल तिखट, १ टीस्पून गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घ्यावे लागेल. तुम्हाला ही टिक्की डीप फ्राय करायची असेल तर तळणासाठी जास्त तेल घ्या. ही टिक्की शॅलो फ्राय सुद्धा करता येते, त्यासाठी जास्त तेलाची आवश्यकता नाही.

अशी बनवा उरलेल्या भाताची टिक्की

उरलेल्या भाताची टिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम एका कढईत तेल गरम करून घ्या. तेल नीट गरम झाल्यानंतर त्यात हिरवी मिरची आणि चिरलेला कांदा घाला. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत साधारण ५ ते ६ मिनिटे शिजवा. त्यानंतर त्यात उरलेल्या भाज्या घालून साधारण ३ ते ४ मिनिटे शिजवून घ्या. या भाज्या खूप जास्त शिजवू नका. आता एका बाउलमध्ये शिजलेला भात, रवा, गरम मसाला, लाल तिखट, मीठ घालून मिक्स करा. यात या शिजवलेल्या भाज्या टाकून मिक्स करा. आता या मिश्रणाचा थोडासा भाग घ्या आणि त्याला टिक्कीचा आकार द्या. आता या टिक्की पॅनमध्ये थोडेसे तेल गरम करून दोन्ही बाजूंनी हलके सोनेरी होईपर्यंत शॅलो फ्राय करा. तुम्ही या टिक्की डीप फ्राय सुद्धा करू शकता. तुमची उरलेल्या भाताची टिक्की तयार आहे. गरमा गरम चहासोबत सर्व्ह करा. तुम्ही ही टिक्की हिरवी चटणी किंवा सॉससोबत सुद्धा खाऊ शकता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us