हिवाळ्यात ‘या’ 5 प्रकारच्या चटण्या बनवून आहारात करा समावेश, शरीर राहील तंदुरस्त

भारतीय जेवणामध्ये पदार्थांची चव वाढण्यासाठी किंवा जेवणाची चव वाढवण्यासाठी चटण्यांचा वापर केला जातो. ज्याप्रमाणे उन्हाळ्यात आंब्याची चटणी व पुदिन्याची चटणी जास्त प्रमाणात खाल्ली जाते. त्याचप्रमाणे हिवाळ्यातही विविध प्रकारच्या चटण्या घरोघरी बनवल्या जातात. तर आजच्या लेखात आपण अशाच काही पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या पाच चटण्यांबद्दल जाणून घेऊयात.

हिवाळ्यात या 5 प्रकारच्या चटण्या बनवून आहारात करा समावेश, शरीर राहील तंदुरस्त
chutneys
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Nov 11, 2025 | 3:46 PM

आपल्या भारतीय जेवणामध्ये विविध प्रकारच्या चटण्यांचे सेवन केले जाते. कारण चटण्या या केवळ अन्नाची चव वाढवतातच असे नाही तर आपल्या आरोग्यासाठी देखील ते खूप फायदेशीर असते. चटण्यांमध्ये कोंथिबीर आणि पुदिना, चिंच, कच्चा आंबा, नारळाची चटणी आणि टोमॅटोची चटणी असे विविध प्रकारच्या चटण्या बनवल्या जातात. जे सर्व पोषक तत्वांनी समृद्ध असतात. चटण्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने या चटण्या आपल्या शरीराला अधिक फायदेशीर ठरतात. तर आजच्या लेखात आपण हिवाळ्यात शरीर उबदार राहण्यासाठी पाच प्रकारच्या चटण्यांबद्दल जाणून घेऊ जे केवळ चवदारच नाहीत तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत.

विविध पदार्थांसह चटण्यांचा आस्वाद घेता येतो. प्रत्येक राज्य आणि प्रदेशानुसार पारंपारिकपणे वेगवेगळ्या चटण्या तयार करतात, ज्या आपल्या देशाच्या वैविध्यपूर्ण चव संस्कृतीचे प्रतिबिंब आहेत. तर, या हिवाळ्यात बनवता येणाऱ्या पाच प्रकारच्या चटण्यांबद्दल जाणून घेऊयात.

आवळा-अदरकची चटणी

आवळा हिवाळ्यातील हंगामी फळ असल्याने व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत आहे, ज्यामुळे हिवाळ्यात ते खाणे आवश्यक आहे. आवळ्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबुत होण्यासोबतच केसांची योग्य वाढ आणि त्वचा हेल्दी ठेवण्यास मदत करते. तुम्ही आवळ्यासोबत अदरक मिक्स करून चटणी बनवू शकता, जे केवळ चव संतुलित करत नाही तर एकूण आरोग्य देखील सुधारते.

अळशीची चटणी

बिहारमध्ये हिवाळ्याच्या दिवसात अळशीच्या चटणी प्रामुख्याने बनवली जाते. ही चटणी दोन प्रकारे बनवली जाते: तर अळशीची चटणीमध्ये अळशी, तीळ, लसूण आणि कढीपत्ता यासारखे अनेक गोष्टींचा वापर करून चटणी बनवली जाते. जे केवळ या चटणीला एक चवच देत नाहीत तर त्यात भरपूर पोषक तत्वे देखील आहेत जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

चविष्ट पेरू चटणी

जेव्हा व्हिटॅमिन सी समृद्ध फळांचा विचार केला जातो तेव्हा लोकं बहुतेकदा लिंबूवर्गीय फळांचा विचार करतात, परंतु हिवाळ्यात उपलब्ध असलेले पेरू हे व्हिटॅमिन सीने समृद्ध असते. तर पेरू हा भाजून खाल्ल्यास घसा खवखवणे आणि खोकल्यापासून आराम देऊ शकते. हिवाळ्यात तुम्ही चविष्ट, गोड-आंबट, किंचित मसालेदार पेरूची चटणी बनवू शकता.

शेंगदाणा-कडीपत्त्याची चटणी

महाराष्ट्रात बनवली जाणारी सर्वात प्रसिद्ध शेंगदाण्याची चटणी चवीला खूप चविष्ट लागते. आवडती भाजी नसली तरी ही चटणी तुम्ही चपाती सह खाऊ शकता. तर ही चटणी बनवताना कोथिंबीरऐवजी कढीपत्ता वापरून एक वेगळा स्वाद द्या. यामुळे हिवाळ्यातील एक उत्तम चटणी बनते. चवीसाठी लिंबूऐवजी थोडे तीळ आणि आवळा यात मिक्स करण्यात आले आहे.

लसूण सॉस

उन्हाळ्यात लसणाची चटणी खाल्ली जात असली तरी हिवाळ्यात ती विशेषतः फायदेशीर असते, कारण लसणाचा उष्णतेवर परिणाम होतो आणि ही लसूण चटणी शरीराला आतून उबदार ठेवते. खिचडीसोबत लसूण आणि टोमॅटोची चटणी अप्रतिम लागते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)