Weight Loss : ‘या’ फळांमुळे उन्हाळ्यात वजन कमी होण्यास मदत होईल, वाचा सविस्तर!

| Updated on: Mar 30, 2022 | 9:14 AM

उन्हाळ्याच्या हंगामाची चाहूल आता लागली आहे. या हंगामात आरोग्यावर (Health) विशेष लक्ष द्यावे लागते. वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्याचा हंगाम फायदेशीर आहे. उन्हाळ्यामध्ये मिळणारे काही फळे शरीर निरोगी (Body healthy) ठेवण्यासोबतच आपले वजन कमी करण्यासही मदत करतात. या फळांमध्ये भरपूर फायबर असते.

Weight Loss : या फळांमुळे उन्हाळ्यात वजन कमी होण्यास मदत होईल, वाचा सविस्तर!
वजन कमी करण्यासाठी या फळांचा आहारात समावेश करा.
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामाची चाहूल आता लागली आहे. या हंगामात आरोग्यावर (Health) विशेष लक्ष द्यावे लागते. वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्याचा हंगाम फायदेशीर आहे. उन्हाळ्यामध्ये मिळणारे काही फळे शरीर निरोगी (Body healthy) ठेवण्यासोबतच आपले वजन कमी करण्यासही मदत करतात. या फळांमध्ये भरपूर फायबर असते. ज्यामुळे बऱ्याच वेळ आपले पोट भरलेले राहण्यास मदत होते. हे चयापचय गती वाढवण्यास मदत करते. अशा प्रकारे ते वजन कमी (Weight Loss) करण्यास मदत करतात. चला जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोणत्या फळांचा आहारात समावेश करू शकता.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी या चार टिप्स फाॅलो करा!

  1. कलिंगड
    कलिंगडमध्ये जवळपास 90 टक्के पाणी असते. हे फळ पचनसंस्था निरोगी ठेवते. संध्याकाळी स्नॅक्स म्हणून तुम्ही याचे सेवन करू शकता. हे साखरेची लालसा कमी करण्यास मदत करते. तसेच वजन कमी करण्यास मदत होते. यामुळे सध्याच्या हंगामामध्ये आपल्या दररोजच्या आहारामध्ये नक्कीच कलिंगडचा समावेश करा.
  2. बेरीज
    ब्लॅकबेरी आणि ब्लूबेरी खाण्यासाठी अत्यंत चवदार असतात. बेरीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. हे वजन कमी करण्यास मदत करते. तुम्ही त्यांना ओट्स इत्यादींमध्ये देखील समाविष्ट करू शकता. विशेष म्हणजे सकाळच्या नाश्त्यामध्ये देखील तुम्ही बेरीचा समावेश करू शकता. ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. बेरी आतड्यांसाठी खूप चांगले आहेत.
  3. द्राक्ष
    द्राक्षमध्ये भरपूर फायबर असते. हे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहण्यास मदत होते. त्याची चव खूप गोड असते. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही द्राक्षाचे सेवन देखील करू शकता. वजन कमी करण्यासाठी तुम्ही उन्हाळ्यातही याचे सेवन करू शकता.
  4. काकडी
    काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असते. हे शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. तुम्ही सॅलड आणि सँडविचच्या स्वरूपातही याचे सेवन करू शकता. त्यातून तुम्ही हेल्दी ड्रिंकही बनवू शकता. उन्हाळ्यात याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे चयापचय गती वाढविण्याचे काम करते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

(या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. TV9 याची पुष्टी करत नाही. तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच वरील टिप्स फाॅलो करा.)

संबंधित बातम्या : 

Allergies & Asthma : अॅलर्जी आणि अस्थमा म्हणजे नेमके काय, उपाय आणि उपचार जाणून घ्या डाॅक्टरांकडून!

IAS Sonal Goel : एक अशी महिला IAS जिनं ‘वजन’ घटवण्यात आनंद मानला, कसा? पाहा फोटो