Health Tips: ‘या’ 5 हर्बल टीचा आहारात समावेश करा आणि निरोगी जीवन जगा!

| Updated on: Oct 29, 2021 | 2:27 PM

बदलत्या ऋतूबरोबर आजारही सुरू होतात. अशा परिस्थितीत लोकांना थंडी आणि उष्णतेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना हंगामी आजारांनाही सामोरे जावे लागत आहे. आजकाल लोकांना ताप, खोकला, सर्दी अशी अनेक लक्षणे दिसू लागली आहेत.

Health Tips: या 5 हर्बल टीचा आहारात समावेश करा आणि निरोगी जीवन जगा!
आरोग्यदायी पेय
Follow us on

मुंबई : बदलत्या ऋतूबरोबर आजारही सुरू होतात. अशा परिस्थितीत लोकांना थंडी आणि उष्णतेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना हंगामी आजारांनाही सामोरे जावे लागत आहे. आजकाल लोकांना ताप, खोकला, सर्दी अशी अनेक लक्षणे दिसू लागली आहेत. कमकुवत प्रतिकारक शक्तीमुळे सर्दी, ताप, खोकला हे आजार होत आहेत. हे सर्व आजार टाळण्यासाठी आपण काही हर्बल टीचा आहारामध्ये समावेश केला पाहिजे.

1. तुळस आणि काळी मिरी

तुळस आणि काळी मिरीचा काढा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात तूप गरम करून त्यात लवंग, काळी मिरी, तुळस आणि आले टाका. हे मसाले चांगले भाजून झाल्यावर त्यात पाणी घालून थोडी साखर घाला. हे मिश्रण पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा. त्यानंतर गरमा-गरमा प्या. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

2. तुळस आणि लवंग काढा

तुळस आणि लवंग एकत्र करून एका भांड्यात काढा आणि नंतर त्यात एक ग्लास पाणी घालून मंद आचेवर उकळा. पाणी अर्धवट राहिल्यावर थोडा वेळ थंड होऊ द्या, नंतर त्यात थोडेसे मीठ टाका आणि हा काढा रोज सेवन करा.

3. आले, मध आणि लिंबाचा चहा 

हे करण्यासाठी, एक चमचा आल्याचा रस, एक चमचा मध, अर्धा चमचा लिंबाचा रस घ्या आणि एका भांड्यात मिसळा. मध चांगले मिसळेपर्यंत ते मिसळत राहा. यानंतर तुम्ही ते रिकाम्या पोटी कोमट पाण्याने घ्या.

4. दालचिनी चहा

दालचिनी अर्धा चमचा आल्याच्या पावडरमध्ये मिसळा, त्यानंतर ते एका ग्लास गरम पाण्यात मिसळा, नंतर त्यात चिमूटभर खडे मीठ टाका, मसाले पाण्यात व्यवस्थित विरघळल्यावर ते गाळून सेवन करा.

5. काढा चहा

यासाठी तुम्हाला आले, एक चमचा हळद, 3 दालचिनी, 4 वेलची, 4 तुळशीची पाने, 4 कप पाणी, काही वाळलेल्या केशरची पाने आणि चवीनुसार मध घ्या. प्रथम आले, हळद, दालचिनी आणि वेलची बारीक करून घ्या. आता हे मिश्रण एका भांड्यात ठेवा आणि ते गरम करा. नंतर हा डेकोक्शन गाळून त्यात मध आणि केशरची पाने मिसळून प्या, खूप फायदा होईल.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Include this herbal tea in your diet and live a healthy life)