Health Tips : रोज रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी प्या आणि अनेक आजारांना दूर ठेवा!

| Updated on: Aug 24, 2021 | 8:23 AM

कदाचित तुम्हाला माहित नसेल की, तुळशीची पाने आपल्याला अनेक रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करू शकतात. तुळशीची पाने उकळून खाल्ल्यास त्याचे फायदे अनेक पटीने वाढतात. तुम्ही सकाळी चहा किंवा लिंबूपाण्याऐवजी तुळशीच्या पानांचे सेवन करू शकता. तुळशीच्या पानांचे पाणी रोज रिकाम्या पोटी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Health Tips : रोज रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी प्या आणि अनेक आजारांना दूर ठेवा!
तुळशीची पाने
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात तुळशीच्या वनस्पतीची पूजा केली जाते. यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. जे रोगांपासून दूर राहण्यास मदत करतात. एवढेच नाही तर आयुर्वेदातही याचा वापर केला जातो. याशिवाय तुळशीच्या पानांचा वापर आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी फायदेशीर आहे. (It is beneficial to drink basil water on an empty stomach every day)

कदाचित तुम्हाला माहित नसेल की, तुळशीची पाने आपल्याला अनेक रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करू शकतात. तुळशीची पाने उकळून खाल्ल्यास त्याचे फायदे अनेक पटीने वाढतात. तुम्ही सकाळी चहा किंवा लिंबूपाण्याऐवजी तुळशीच्या पानांचे सेवन करू शकता. तुळशीच्या पानांचे पाणी रोज रिकाम्या पोटी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ते कसे बनवायचे आणि त्याचे फायदे जाणून घेऊयात.

तुळशीच्या पानांचे पाणी

यासाठी एका पातेल्यात एक ग्लास पाणी घालून चांगले उकळू द्या. पाणी उकळल्यावर तुळशीची पाने घाला. पाण्याचे प्रमाण निम्म्यावर येईपर्यंत हे पाणी उकळा. यानंतर, गॅस बंद करा आणि फिल्टर करा. चव वाढवण्यासाठी मध देखील यामध्ये मिक्स केला जाऊ शकतो.

साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते

तुळशीचे पाणी चयापचय वाढवण्यास मदत करते. यामुळे, चरबी आणि कार्बोहायड्रेट बर्न करण्यास मदत होईल. तसेच रक्तातील साखरेची पातळी राखते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे.

पाचक प्रणालीसाठी चांगले

जर तुम्हाला अपचन आणि अॅसिडिटीची समस्या असेल तर रोज 2 ते 3 पाने चावून खा. याशिवाय तुळशीच्या पानांचा रस आणि लिंबाचा रस मिसळून नारळाचे पाणी प्यायल्याने पोटदुखी दूर होते.

वजन कमी करते

आज प्रत्येक व्यक्ती वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहे. कारण लठ्ठपणा इतर रोगांना आमंत्रण देतो. वास्तविक तुळशीचे पान चयापचय वाढवण्यास मदत करते. यामुळे वजन नियंत्रित होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(It is beneficial to drink basil water on an empty stomach every day)