Health Care : रोजच्या आहारात थोडासा बदल करा आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवा!

यकृतापासून कोलेस्टेरॉल तयार होते. रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले की हृदयविकाराचा धोका वाढतो. त्याबरोबर पक्षाघाताची शक्यता असते. आपण आहारातून कोलेस्टेरॉल पूर्णपणे काढून टाकू शकत नाही. कारण रक्तातील चरबी हार्मोन्स तयार करण्यास मदत करते. एचडीएल कोलेस्टेरॉल शरीराला निरोगी ठेवण्यासाठी भूमिका बजावते.

Health Care : रोजच्या आहारात थोडासा बदल करा आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवा!
Image Credit source: emedicinehealth.com
| Edited By: | Updated on: May 01, 2022 | 11:39 AM

मुंबई : दैनंदिन जीवनामध्ये अति तणाव, धूम्रपान, मद्यपान (Alcoholism) यामुळे आपल्या शरीरात अनेक समस्या निर्माण होत आहेत. कोलेस्टेरॉल हे त्यापैकी एक आहे. कोलेस्टेरॉलची पातळी सामान्यपेक्षा जास्त असते, परंतु हृदयविकार देखील नंतर येतो. रक्तदाब वाढतो, स्ट्रोकची शक्यता असते. वयानुसार कोलेस्टेरॉलच्या (Cholesterol) समस्या वाढतात. तरुणांनाही याच समस्येने ग्रासले आहे. बराचसा वेळ लॅपटॉप-मोबाईलच्या स्क्रीनवर घालवला जातो. त्यानंतर फास्टफूड आणि जंकफूड (Junk food) खाण्यावर जास्त भर दिला जातो. सध्याच्या जीवनशैलीमध्ये हेल्दी आहार कोणालाही खायला अजिबात आवडत नाही. चमकदार आणि तळलेले पदार्थ खाण्यावर लोकांचा भर अधिक आहे.

कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो

यकृतापासून कोलेस्टेरॉल तयार होते. रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले की हृदयविकाराचा धोका वाढतो. त्याबरोबर पक्षाघाताची शक्यता असते. आपण आहारातून कोलेस्टेरॉल पूर्णपणे काढून टाकू शकत नाही. कारण रक्तातील चरबी हार्मोन्स तयार करण्यास मदत करते. एचडीएल कोलेस्टेरॉल शरीराला निरोगी ठेवण्यासाठी भूमिका बजावते. परंतु जेव्हा शरीरातील खराब कोलेस्टेरॉल किंवा एलडीएलची पातळी वाढते तेव्हा ते रक्तवाहिन्यांमध्ये पूर्णपणे जमा होते. जे रक्तप्रवाहात अडथळा आणते आणि हृदयविकाराच्या मुख्य कारणांपैकी एक आहे.

या गोष्टी टाळा आणि कोलेस्टेरॉल कमी करा

जर तुम्ही ट्रान्स फॅट, कर्बोदके, जास्त गरम असलेले पदार्थ दिवसेंदिवस खाल्ले आणि तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यायाम करत नसाल तर कोलेस्टेरॉलची समस्या होणार म्हणजे होणार आहे. म्हणूनच जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात थोडासा बदल करू शकलात तर शरीर निरोगी राहील. काही वाईट सवयी फक्त तुमच्या शरीराच्या फायद्यासाठी काढून टाकल्या पाहिजेत. खाण्यापिण्याच्या सवयी बदलून, पॅकबंद पदार्थांपासून दूर राहून, अनावश्यक ताणतणाव कमी घेऊन आणि व्यायामाच्या सवयी बदलूनच कोलेस्ट्रॉल नियंत्रित करता येते.