AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | बेरोजगारीमुळे एकटेपणात वाढ, संशोधनातून समोर आलेल्या धक्कादायक बाबी काळजी वाढवणाऱ्या!

2017-2019 दरम्यान त्यानंतर 2018-2020 पर्यंत वय, लिंग, वांशिकता, शिक्षण, वैवाहिक स्थिती, घरगुती रचना, घरातील आणि प्रदेशातील स्वतःच्या मुलांची संख्या यासह घटकांवर नियंत्रण ठेवून सहभागींच्या प्रतिसादांचे विश्लेषण केले गेले. कमी झालेल्या एकाकीपणामुळे बेरोजगारी कमी होऊ शकते आणि रोजगारामुळे एकाकीपणा कमी होतो.

Health | बेरोजगारीमुळे एकटेपणात वाढ, संशोधनातून समोर आलेल्या धक्कादायक बाबी काळजी वाढवणाऱ्या!
Image Credit source: unsplash.com
| Edited By: | Updated on: May 01, 2022 | 10:51 AM
Share

मुंबई : सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये (Lifestyle) आपल्या जीवनामध्ये अनेक बदल झाले आहेत. ताणतणाव आयुष्यामध्ये वाढला आहे. त्यामध्ये देशात बेरोजगारी देखील जास्त आहे. एका नवीन संशोधनानुसार एक धक्कादायक गोष्ट पुढे आली आहे, एकाकीपणाचा अनुभव घेणाऱ्या लोकांना भविष्यात बेरोजगारीचा (Unemployment) धोका जास्त असतो. ज्या लोकांना अनेकदा एकटेपणा जाणवतो त्यांच्या आयुष्यात नंतरच्या काळात त्यांच्या नोकऱ्या (Job) गमावण्याची शक्यता देखील जास्त असल्याचे संशोधनामध्ये म्हटंले आहे. हे संशोधन बीएमसी पब्लिक हेल्थ या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आल आहे.

बेरोजगारीमुळे एकाकीपणा येतो

बेरोजगार असल्‍याने एकाकीपणा येऊ शकतो. या संशोधनामध्ये असेही दिसून आले आहे की, ज्यालोकांच्या हाताला काम आहे किंवा ते एखाद्या ठिकाणी काम करतात. त्यांच्यामध्ये एकटेपणा जाणवत नाही आणि त्यांच्या आयुष्यामध्ये तणावही कमी असतो. संशोधणात एकटेपणा अनुभवण्यासाठी अंडरस्टँडिंग सोसायटी हाऊसहोल्ड लॉंगिट्युडिनल स्टडीमधील 15,000 हून अधिक लोकांकडून मोठ्या प्रमाणावर महामारीपूर्व डेटाचे विश्लेषण केले गेले.

आरोग्य आणि जीवनावरही घातक परिणाम

2017-2019 दरम्यान त्यानंतर 2018-2020 पर्यंत वय, लिंग, वांशिकता, शिक्षण, वैवाहिक स्थिती, घरगुती रचना, घरातील आणि प्रदेशातील स्वतःच्या मुलांची संख्या यासह घटकांवर नियंत्रण ठेवून सहभागींच्या प्रतिसादांचे विश्लेषण केले गेले. कमी झालेल्या एकाकीपणामुळे बेरोजगारी कमी होऊ शकते आणि रोजगारामुळे एकाकीपणा कमी होतो, जो आरोग्य आणि जीवनाच्या गुणवत्तेसह इतर घटकांशी सकारात्मक संबंध ठेवू शकतो. असे या संशोधनातून दिसून आले आहे. म्हणजेच जे लोक रिकामे असतात, त्यांच्या हातामध्ये काहीही काम नसते, तेंव्हा त्यांच्यामध्ये एकटेपणा जास्त असतो.

Follow Us
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...