घरचे-घरी खास हेल्दी काजू कतली तयार करा, पाहा रेसिपी!

| Updated on: Oct 17, 2021 | 9:24 AM

काजू कतली खाणे आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच आवडते. जर तुम्हाला नेहमी प्रश्न पडल असेल की काजू कतली मिठाईच्या दुकानातल्या सारखी कशी बनवायची. तर आज आम्ही तुम्हाला घरचे-घरी काजू कतली बनवण्याची खास रेसिपी सांगणार आहोत. विशेष म्हणजे ही काजू कतली आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. 

घरचे-घरी खास हेल्दी काजू कतली तयार करा, पाहा रेसिपी!
काजू कतली
Follow us on

मुंबई : काजू कतली खाणे आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच आवडते. जर तुम्हाला नेहमी प्रश्न पडल असेल की काजू कतली मिठाईच्या दुकानातल्या सारखी कशी बनवायची. तर आज आम्ही तुम्हाला घरचे-घरी काजू कतली बनवण्याची खास रेसिपी सांगणार आहोत. विशेष म्हणजे ही काजू कतली आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.

काजू कतलीचे साहित्य

1 1/2 कप ग्राउंड काजू

1/2 कप पाणी

1 1/2 चमचे तूप

1 कप साखर

4 इंच सिल्वर वर्क

1 चमचा हिरवी वेलची पावडर

स्टेप 1-

घरी काजू कतली बनवण्यासाठी आधी काजू पावडर बनवावी लागते. 1 1/2 कप काजू घ्या आणि ते बारीक करा, आपण ते जास्त पीसणार नाही याची खात्री करा. कारण काजू तेल सोडू शकते. ज्यामुळे पावडर जाड होऊ शकते. नंतर चाळणीच्या मदतीने बारीक पावडर काढून बाजूला ठेवा.

स्टेप 2-

दरम्यान, मध्यम आचेवर एक पॅन गरम करा आणि साखरेसह मिक्स करा. साखर विरघळत नाही तोपर्यंत ढवळत रहा. जेव्हा मिश्रण उकळू लागते तेव्हा गॅस कमी करा आणि काजूची बारीक पूड घाला. ढवळत राहा आणि मिश्रण गुळगुळीत आणि किंचित जाड असल्याची खात्री करा. जर तुम्हाला तूप आवडत असेल, तर या मिश्रणात थोडे तूप घाला, हे या मिठाईला छान चव आणि सुगंध देईल. ढवळत रहा आणि वेलची पूड घाला. हे मिश्रण पुरेसे घट्ट झाल्यावर गॅस बंद करा.

स्टेप 3-

काजू कतलीचे मिश्रण एका भांड्यात काढा आणि मऊ पीठ मळून घ्या. काजू कतलीचे पीठ गुळगुळीत आणि क्रॅकविरहित असल्याची खात्री करा. एक ट्रे घ्या आणि त्याला थोडे तूप लावा. मग पीठ बाहेर काढा आणि रोलिंग पिनच्या मदतीने सपाट करा. सिल्वर वर्क लावा आणि काही काळ सेट होऊ द्या.

स्टेप 4-

आता काजू कतलीला क्लासिक डायमंड आकारात कट करा आणि आपल्या प्रियजनांना ही स्वादिष्ट काजू कतली द्या.

टिप्स

जर तुम्हाला काजू कतली हेल्दी व्हेरिएंट बनवायचे असेल तर साखरेऐवजी शुगर फ्री किंवा स्टीव्हियाने घ्या.

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

(Make special cashew katli at home, see recipe)