Weight Loss : अतिरिक्त साखर आणि चमकदार पदार्थ खाणे सोडा आणि वजन कमी करा, वाचा खास टिप्स!

| Updated on: Apr 19, 2022 | 11:26 AM

वाढलेल्या वजनामुळे (Weight) अनेकजण त्रस्त आहेत. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारची आैषधे पण घेतात. मात्र, वजन कमी करण्यासाठी आैषधे घेणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक (Dangerous) आहे. नेहमीच निरोगी पध्दतीने वजन कमी करणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. वजन कमी करण्यासाठी आपल्याला आहार आणि व्यायामाकडे विशेष लक्ष द्यावे लागते.

Weight Loss : अतिरिक्त साखर आणि चमकदार पदार्थ खाणे सोडा आणि वजन कमी करा, वाचा खास टिप्स!
वजन कमी करण्यासाठी या गोष्टी खाणे टाळा.
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : वाढलेल्या वजनामुळे (Weight) अनेकजण त्रस्त आहेत. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारची आैषधे पण घेतात. मात्र, वजन कमी करण्यासाठी आैषधे घेणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक (Dangerous) आहे. नेहमीच निरोगी पध्दतीने वजन कमी करणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. वजन कमी करण्यासाठी आपल्याला आहार आणि व्यायामाकडे विशेष लक्ष द्यावे लागते. आपण किती कॅलरी (Calories) घेतो आणि दिवसभरामध्ये किती बर्न करतो. याचे गणित जर आपल्याला एकदा समजले तर वजन कमी करणे अधिक सोपे होते.

कॅलरी बर्न करा

वजन कमी करण्यासाठी आपण दिवसभरामध्ये जास्त पाणी आणि कॅलरी जास्त नसलेले पेय आहारामध्ये घ्यायला हवेत. मात्र, या पेयांमध्ये अजिबात साखर नसावी. साखरेमध्ये कॅलरीजही जास्त असतात. रिकाम्या पोटी साखर खाल्ल्याने वजन वाढते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी साखरयुक्त पेय पिणे टाळणे महत्वाचे आहे.

BMI अत्यंत महत्वाचा

गोड आणि तळलेले पदार्थ खाणे 100 टक्के टाळा, जोपर्यंत आपले वजन आपल्या BMI प्रमाणे होत नाही तोपर्यंत. एकदा जर आपले वजन BMI प्रमाणे झाले तर महिन्यातून एक -दोन वेळा खाणे ठिक आहे. तेलात तळलेले किंवा गोड पदार्थ खाल्ल्यानेही वजन वाढते. म्हणूनच फायबरयुक्त पदार्थ जास्त खा. तसेच भाज्या, फळे, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स शरीर दीर्घकाळ ऊर्जावान ठेवतात.

रात्रीच्या जेवणावर लक्ष ठेवा

वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे रात्रीचे जेवण आहे. रात्रीच्या जेवणामध्ये आपण काय घेतो यावर सर्वकाही ठरलेले असते. रात्रीच्या जेवणामध्ये शक्यतो कमी कॅलरीज घ्या. रात्रीच्या जेवणात प्रथिने, कार्बोहायड्रेट जास्त घ्या. रात्रीचे जेवण झाल्यानंतर किमान वीस मिनिटे फिरा. 7 च्या अगोदरच जेवण करण्याच्या प्रयत्न करा. जेवण झाले की, लगेचच अजिबात झोपू नका.

संबंधित बातम्या : 

Weight Loss | उन्हाळ्यात ही कमी कॅलरी पेय प्या आणि निरोगी राहण्यासोबतच वजन कमी करा!

Skin Care Tips : उन्हाळ्यातील या चुकांमुळे त्वचा अधिक कोरडी होऊ शकते, वाचा महत्वाचे!