
प्रेम ढाबा या ढाब्याचे बटर चिकन खूप प्रसिध्द आहे. इथले जेवण चविष्ट तसेच स्वस्त आहे आणि तुम्हाला इथे बसून खाण्याची सोयही मिळेल. विशेष बाब म्हणजे ते नवी दिल्ली रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरच आहे.

राजिंदर दा ढाबा हे दिल्लीतील सर्वात जुन्या रेस्टॉरंटपैकी एक मानले जाते. त्याची नॉनव्हेज टेस्ट फक्त दिल्लीतच नाही तर भारताच्या अनेक भागात प्रसिद्ध आहे. तुम्हाला इथले बटर चिकन आवडेल. यासोबतच तुम्ही या ठिकाणी चिकन आणि मटणाचे इतर चविष्ट पदार्थ देखील ट्राय करू शकता.

गुलाटी रेस्टॉरंट हे दिल्लीच्या पंडारा रोड मार्केटमध्ये असलेल्या गुलाटी रेस्टॉरंटच्या बटर चिकनची गोष्ट खास आहे. असं म्हणतात की हे दुकान 1959 पासून सुरू आहे. येथील बटर चिकन खास असते.

दरियागंज नाॅनव्हेडसाठी खूप प्रसिद्ध आहे. इथे अशी अनेक रेस्टॉरंट्स आहेत, जिथे तुम्ही बटर चिकनचा आस्वाद घेऊ शकता. हे ठिकाण राजेशाही थाटासाठीही ओळखले जाते.

दिल्लीच्या राजौरी गार्डन भागात 'ढाबा' हे एक खास रेस्टॉरंट आहे. तुम्ही इथे बटर चिकन आणि गार्लिक नॉन-टेस्ट देसी स्टाईलमध्ये ट्राय करू शकता. इथलं जेवण थोडं महाग आहे, पण चवीच्या बाबतीत या रेस्टॉरंट जोड नाही.