Kedney Health: जिभेवर दिसणारी ही लक्षणे सांगतात किडनी खराब होत असल्याचे संकेत

Kidney Damage Cure : आपली जीभ आपल्याला अनेक प्रकारचे संकेत देत असते. आपल्या शरीरात जर कोणतीही बिघाड झाली तर जीभेवर आधी त्याचे परिणाम दिसू लागतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जिभेवर दिसणारी लक्षणे किडनीची समस्या असल्याचे कसे दर्शवतात.

Kedney Health: जिभेवर दिसणारी ही लक्षणे सांगतात किडनी खराब होत असल्याचे संकेत
| Edited By: | Updated on: Feb 12, 2024 | 6:46 PM

Kedney Health : किडनी आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. किडनीतूनच शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. किडनीवर कोणत्याही प्रकारचा विपरित परिणाम होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण किडनीच्या कोणत्याही समस्या उद्भवल्या तर त्याचा लघवी आणि रक्त योग्यरित्या फिल्टर करू शकत नाही. किडनीत बिघाड झाल्यास त्याची लक्षणे आधीच दिसू लागतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुमची जीभ कशी याबाबत संकेत देते.

जिभेवर कोणती लक्षणे दिसतात.

  • जेव्हा मूत्रपिंडात काही बिघाड होतो तेव्हा लाळ ग्रंथी प्रभावित होते. ज्यामुळे तोंड कोरडे पडू लागते. अशी लक्षणे दिसल्यास समस्या वाढू शकतात.
  • जिभेवर जर पांढरे डाग दिसू लागले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे मूत्रपिंडाची समस्या दर्शवते.
  • किडनीच्या समस्येत जिभेवर धातूची चव जाणवते. जर तुम्हाला अशी चव वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. याशिवाय जिभेतून रक्तस्त्राव किंवा वेदना होण्याची शक्यता जास्त असते. किडनी संसर्ग झाल्यास अशी लक्षणे दिसू लागतात.

इतर काही लक्षणे

  • किडनीच्या कार्यामध्ये अडथळे आल्यास त्याचा थेट परिणाम आपल्या झोपेवर होतो. निद्रानाशाची समस्या अशा लोकांना उद्भवते.
  • किडनीच्या समस्येमुळे जेव्हा विषारी पदार्थ बाहेर पडत नाहीत तेव्हा ती घाण रक्तात जमा होऊ लागते आणि त्यामुळे त्वचेवर खाज येण्याचे कारण बनते.
  • जेव्हा किडनी खराब होते तेव्हा जास्त प्रथिने बाहेर पडतात. यामुळे लघवीचा रंग पिवळा किंवा तपकिरी होऊ लागतो. अनेक वेळा लघवीतून फेस येऊ लागतो.
  • जेव्हा मूत्रपिंड आपल्या शरीरातून सोडियम काढू शकत नाही, तेव्हा ते शरीरात जमा होऊ लागते. त्यामुळे पाय आणि चेहऱ्याला सूज येऊ लागते.
  • मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे पाय आणि स्नायूंमध्ये पेटके येऊ लागतात. कारण सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम किंवा इतर इलेक्ट्रोलाइट्सच्या पातळीत असंतुलन आहे.

अस्वीकरण: वरील लेख फक्त सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे वैद्यकीय मत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.