स्वयंपाकघरात चुकूनही ठेऊ नका कचऱ्याचा डबा; ही एक चूक महागात पडेल

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराबाबतही काही नियम सांगितले आहेत. तसेच स्वयंपाकघराशी संबंधित एक चूक आहे जी लोक अनेकदा करतात. ती म्हणजे स्वयंपाकघरात डस्टबिन ठेवणे. स्वयंपाकघरात कधीही डस्टबिन ठेऊ नये असे म्हटले जाते. पण असं का म्हटलं जातं हे जाणून घेऊयात.

स्वयंपाकघरात चुकूनही ठेऊ नका कचऱ्याचा डबा; ही एक चूक महागात पडेल
Kitchen Dustbin Placement, Vastu Shastra Tips & Negative Effects
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 20, 2025 | 2:37 PM

वास्तूशास्त्रात घराबाबत, घरातील गोष्टींबाबत अनेक नियम सांगितले गेले आहेत. वास्तुशास्त्रानुसार, घरातील प्रत्येक वस्तू योग्य दिशेने असावी. सर्व वस्तू व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत. वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते बेडरूम, बाथरूम आणि पूजा खोलीपर्यंत अनेक नियम आहेत. स्वयंपाकघराबाबतही काही नियम आहेत जे योग्यरित्या पाळल्यास घरात कधीही नकारात्मक ऊर्जा येत नाही.

स्वयंपाकघराशी संबंधित एक चूक, जे लोक अनेकदा करतात 

स्वयंपाकघराशी संबंधित एक चूक आहे जी लोक अनेकदा करतात.त्यातील एक गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरात ठेवला जाणारा डस्टबिन. वास्तुशास्त्रानुसार असे करणे योग्य मानले जात नाही. स्वयंपाकघरात कधीही डस्टबिन ठेवू नये. सोयीसाठी, बरेच लोक स्वयंपाकघरात तसेच बाहेरही डस्टबिन ठेवतात, परंतु असे करणे योग्य नाही. त्याचे काय परिणाम होऊ शकतात ते जाणून घेऊयात.

स्वयंपाकघरात डस्टबिन का ठेवू नये?

शास्त्रांनुसार, स्वयंपाकघरात कचराकुंडी ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न राहत नाही असं म्हटलं जातं. असे केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होऊ लागते. नकारात्मक ऊर्जा वाढल्यामुळे घरातील सदस्यांना नेहमीच चिडचिड वाढू लागते. तसेच, लोक कोणत्याही कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. तसेच आपण अनेक गोष्टी त्या कचऱ्यात टाकत असतो. त्या घाणीमुळे अनेकदा ती नकारात्मकचा नकळत का होईना पण घरातही पसरू लागते. आकर्षित होते. त्यामुळे शक्यतो स्वयंपाकघरात कधीही कचराकुंडी ठेवू नये असं म्हटलं जातं.

मग डस्टबिन कुठे ठेवावा?

आता प्रश्न असा आहे की जर डस्टबिन स्वयंपाकघरात ठेवायचा नसेल तर तो कुठे ठेवावा? स्वयंपाकघरातील डस्टबिन स्वयंपाकघराबाहेर ठेवावा. डस्टबिन कधीही घराच्या मुख्य गेटवर देखील ठेवू नये. कारण देवी लक्ष्मी मुख्य दारातूनच घरात प्रवेश करते. अशा परिस्थितीत, या ठिकाणी डस्टबिन ठेवणे योग्य नाही असे मानले जाते. जर डस्टबिन घराच्या नैऋत्य किंवा वायव्य दिशेला ठेवला असेल तर ते करणे योग्य आहे. डस्टबिन कधीही घराच्या आत ईशान्य दिशेला चुकूनही ठेवू नका. तसेच, आग्नेय दिशेने ठेवणे योग्य नाही.

दरम्यान तुम्हाला काम करेपर्यंत कचरा टाकण्यासाठी डस्टबिन जवळ असणे सोयीचे वाटत असेल तर काम होईपर्यंत तिथे वापरून नंतर तुम्ही तो बाहेर ठेवा.

 

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही)