Kitchen Tips : किचनमधील लाकडाच्या चमच्यांना लागतेयबुरशी ? स्वच्छ करण्यासाठी खास टीप्स

Kitchen Tips : आता अनेकांच्या घरात लाकडाचे चमचे असतात. पण वापर न झाल्याने त्यांना बुरशी लागते... अशात बुरशी लागल्यावर काय करायचं? असा प्रश्न महिलांना पडतो... तर जाणून घ्या लाकडाच्या चमच्यांना बुरशी लागली की काय करयाचं?

Kitchen Tips : किचनमधील लाकडाच्या चमच्यांना लागतेयबुरशी ? स्वच्छ करण्यासाठी खास टीप्स
| Updated on: Oct 02, 2026 | 11:18 AM

Kitchen Tips : आज आपण पाहायला गेलं तर, अनेकांच्या घरात वेगवेगळ्या प्रकारची भांडी असतात. स्टिल, नॉन – स्टिक, मातीची भांडी असतात. तर अनेकांच्या घरात लाकडी चमचे देखील असतात. पण लाकडी चमच्यांची योग्य काळजी न घेतल्यास, त्यांच्यात ओलावा टिकून राहण्याची आणि त्यांना बुरशी लागण्याची, त्यांचा रंग फिका पडण्याची आणि ते तुटण्याची शक्यता अधिक असते. लाकडी चमच्यांचा टिकाऊपणा आणि चमक वाढवण्यासाठी काही उपाय आहेत. ज्यामुळे तुमचे चमचे अधिक काळ चांगले राहतील… तर जाणून घ्या काही खास टीप्स ज्यामुळे तुमच्या किचनमधील लाकडाचे चमचे स्वच्छ राहतील.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, लाकडाचे चमचे डिशवॉशरमध्ये ठेवू नका, हाताने धुवा… लाकडी चमचे डिशवॉशरमध्ये कधीही धुवू नका. जास्त उष्णता आणि पाण्याशी दीर्घकाळ संपर्क आल्याने लाकूड वाकडे होऊन त्याला तडे जाऊ शकतात. वापरल्यानंतर, ते फक्त कोमट पाण्याने आणि सौम्य साबणाने हाताने धुवा.

Loading...

जास्त काळ पाण्यात बुडवू नका. भांडी धुताना लाकडी चॉपस्टिक्स सिंकमध्ये सोडू नका. लाकूड पाणी शोषून घेते, ज्यामुळे जिवाणू आणि दुर्गंधी वाढू शकते. धुतल्यानंतर लगेच स्वच्छ कापडाने पुसून घ्या आणि हवेशीर जागेत पूर्णपणे कोरडे करा. दमट, बंद कपाटांमध्ये ठेवल्यास बुरशी लागण्याचा धोका असतो.

डाग आणि दुर्गंधी काढण्यासाठी लिंबू आणि बेकिंग सोड्याचा वापर करा. डाग, तेल किंवा दुर्गंधी काढण्यासाठी, त्यावर थोडा बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस चोळणे उत्तम. तसेच, व्हिनेगरच्या द्रावणात 5 मिनिटं भिजवून ठेवल्यास जंतू मरतात.

महिन्यातून एकदा लाकडी चमच्यांना खाद्य-दर्जाचं खनिज तेल किंवा मधमाशांचे मेण लावा आणि रात्रभर तसेच राहू द्या. यामुळे लाकूड कोरडे होऊन त्याला तडे जाणार नाहीत. खोबरेल तेल किंवा इतर खाद्य तेलांच्या नियमित वापरामुळे नंतर त्यांना दुर्गंध येऊ शकतो.

स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या टीप्स…
स्वयंपाक झाल्यावर ओव्हन आणि स्टोव्हटॉपवरील तेलकटपणा आणि डाग लगेच पुसून टाका. सिंकमध्ये भांडी रचून ठेवल्याने माश्या आणि दुर्गंधी येऊ शकते. रात्री झोपण्यापूर्वी सिंक धुवून कोरडे करा. स्वयंपाकघरातील कचरा दररोज काढा. कचरापेटीखाली कागद किंवा झाकण ठेवल्याने दुर्गंधी आणि ओलावा टाळता येतो. फ्रिजमधून खराब झालेलं अन्न काढून टाका आणि आतील भाग पुसून घ्या, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हवा खेळती राहील याची खात्री करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us