खिशाला बसणार नाही चाट, घरच्या घरी असे करा फेशिअल, मिळतील अनेक फायदे…

Coffee Facial For Skin : चमकदात त्वचा मिळावी म्हणून अनेक उपाय केले जातात. जर तुम्हाला पार्लर मध्ये जाऊन पैसे खर्च न करता, घरच्या घरी फेशिअल करायचे असेल तर हे नक्की वाचा..

खिशाला बसणार नाही चाट, घरच्या घरी असे करा फेशिअल, मिळतील अनेक फायदे...
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Sep 06, 2023 | 5:03 PM

Facial For Skin : सुंदर दिसायला कोणाला आवडतं नाही ? आपली त्वचा छान, क्लिअर आणि चमकदार (glowing skin) दिसावी असे प्रत्येकालाच वाटते. त्यासाठी बरेच उपाय केले जातात. कधी महागडी प्रॉडक्ट्स वापरून तर कधी पार्लरमध्ये जाऊन, लोकं चेहरा सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र त्याचा दरवेळेस फायदा होतोच अस नाही. अशा वेळी तुम्हाला घरच्या घरी काही उपाय करता आले तर ? त्यासाठी तुम्ही घरी फेशिअल (home made facial) करू शकता.

बहुतांश लोकांची सकाळची सुरूवात एक कप कॉफी पिऊन होते. त्यामुळे एनर्जी मिळते. पण कॉफी आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का ? तुम्ही कॉफीचा स्किनकेअर रूटीनमध्ये समावेश करू शकता. कॉफी आपल्या त्वचेवर साचलेली घाण काढून टाकण्यास मदत करते. तसेच त्यामुळे डेड स्कीनही निघून जाते. त्वचेसाठी कॉफीचा वापर अनेक प्रकारे होऊ शकतो. जर पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल तर घरी कॉफीचा उपयोग करून फेशिअलही करता येते. त्यासाठी जास्त खर्चही येणार नाही.

घरी कसे करावे फेशिअल ?

  1. कॉफी फेशिअल –  हे फेशिअल करण्यासाठी एका भांड्यात २ चमचे कच्चे दूध घ्यावे. त्यात एक चमचा कॉफी पावडर घालावी. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने त्वचेला मसाज करावा. थोड्या वेळाने चेहऱ्याला लावलेले मिश्रण साध्या पाण्याने स्वच्छ धुवून टाकावे.
  2. स्क्रबिंग – स्किन स्क्रब करण्यासाठी एका वाटीत एक चमचा कॉफी पावडर घेऊन त्यात थोडी साखर मिसळावी. नंतर त्यात थोडं नारळाचं तेलं घालावं. हे सर्व नीट करून चेहरा आणि मानेला लावा. ते मिश्रण लावून कमीत कमी 3 ते 4 मिनिटे स्क्रब किंवा मसाज करावा. 15 मिनिटे हे मिश्रण त्वचेवर तसेच राहू द्यावे. नंतर साध्या पाण्याचने चेहरा व मान स्वच्छ धुवावे. यामुळे त्वचेवर साचलेली घाण निघून जाईल.
  3. वाफ घ्यावी – त्वचेवर वाफ घेण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन ते चांगले उकळावे. नंतर ते पातेलं खाली उतरवून स्टूल वर ठेवा. चेहऱ्यावरून एक मोठा टॉवेल ओढून घ्या आणि कमीत कमी १० मिनिटे गरम पाण्याची वाफ घ्या. चेहऱ्यावर सर्वत्र नीट वाफ येऊ द्यावी. यामुळे तुम्हाला ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सच्या समस्येपासून मुक्ती मिळेल.
  4. फेस पॅक – तुम्ही कॉफीचा फेस पॅकही वापरू शकता. यासाठी एका वाटीत एक चमचा कॉफी पावडर घेऊन त्यामध्ये थोडं दही घाला. हे दोन्ही पदार्थ नीट मिक्स करून चेहरा आणि मानेवर लावावे व काही वेळ तसेच राहू द्यावे. 10 मिनिटांनी पॅक काढून चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.
  5. मालिश – शेवटी, त्वचेला मालिश करावे. यासाठी एका वाटीत २ चमचे कोरफडीचे जेल घ्यावे व त्यामध्ये एक चमचा कॉफी पावडर मिसळावी. आता हा पॅक त्वचेवर नीट लावून मालिश करावे. हा पॅक चेहऱ्यावर 20 मिनिटे राहू द्यावे. नंतर रुमाल ओला करून किंवा वेट टिश्यू- पेपरचा वापर करून चेहरा स्वच्छ करावा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Non Stop LIVE Update
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?.
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?.
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?.
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?.
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली.
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?.
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक.
नवाब मलिक अधिवेशनात, कोणाला पाठिंबा देणार? अजित पवार की शरद पवार?
नवाब मलिक अधिवेशनात, कोणाला पाठिंबा देणार? अजित पवार की शरद पवार?.
चार पक्ष अन् सगळे दक्ष; सातारा लोकसभा एकच लक्ष्य, कोणी सांगितला दावा?
चार पक्ष अन् सगळे दक्ष; सातारा लोकसभा एकच लक्ष्य, कोणी सांगितला दावा?.
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला.