
Tips To Prevent Hair Fall in Monsoon : सध्या देशाच्या बहुतांश भागात पाऊस पडत आहे. या ऋतूत आजारांचा कहर वाढतो. तसेच या काळात स्किन आणि केसांचीही (skin and hair care) अधिक, विशेष काळजी घ्यावी लागते, अन्यथा बराच त्रास होऊ शकतो. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार केसगळतीची (Hair Fall) समस्या पावसाळ्यात सर्वाधिक दिसून येते. तुम्हालाही हा त्रास होत असेल तर केसगळतीचे कारण जाणून घेऊन त्यावर काय उपाय करता येतील हेही समजून घ्या. त्यामुळे केसगळती तर थांबेलच शिवाय लांब व मजबूत केस मिळतील.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, पावसाळ्यात हवेत आणि वातावरणात जास्त आर्द्रता असते आणि खूप घाम येतो. या ऋतूमध्ये जास्त भिजल्यामुळे स्काल्पही कोरडा होऊ शकतो. त्यामुळे केस कमकुवत होऊन तुटायला लागतात. पाण्यात भिजल्यास अनेक वेळा स्काल्पला इन्फेक्शनही होऊ शकते, जे केसगळीतासाठीही कारणीभूत ठरते. अशा परिस्थितीत केसांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.
पावसाळ्यात रोज तुटू शकतात 300 केस
दररोज केस धुताना आणि ते विंचरताना शंभर केस तुटणे नॉर्मल आहे. पण पावसाळ्याच्या दिवसांत 300 केसही तुटू शकतात. त्यामुळे केसांची विशेष निगा राखली पाहिजे व केसगळती रोखण्यासाठी शक्य ते सर्व उपाय केले पाहिजे.
केसगळती कशी रोखाल ?
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)