Lagn Shubh Muhurt 2026: यंदा कर्तव्य आहे.. दोन महिन्यांत लग्नाचे 11 शुभ मुहूर्त; यादी पाहा अन् लगेच तारीख धरा!
तुमच्याही घरात यंदा कर्तव्य असेल किंवा तुम्ही लग्नाचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यातील शुभ मुहूर्तांची तारीख आता समोर आली आहे.

November December Vivah Lagn Muhurt: तुळशी विवाह पार पडल्यानंतर घरोघरी लग्नाची लगबग सुरु होते. लग्नाआधी सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे शुभ मुहूर्त पाहणे. विवाहासाठी शुभ मुहूर्त, वार, नक्षत्र, योग या सर्व गोष्टींचा विचार केला जातो अन् लग्न ठरवले जाते. तुमच्याही घरात यंदा कर्तव्य असेल किंवा तुम्ही लग्नाचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यातील शुभ मुहूर्तांची तारीख आता समोर आली आहे.
नोव्हेंबर महिन्यातील लग्नाच्या शुभ तारखा!
21 नोव्हेंबर 2026, शनिवार: सकाळी 6.48 ते रात्री 12.8 (नोव्हेंबर 22)
24 नोव्हेंबर 2026, मंगळवार: रात्री 11.25 ते सकाळी 6. 52 (नोव्हेंबर 25)
25 नोव्हेंबर 2026, बुधवार: सकाळी 6.52 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6.52
26 नोव्हेंबर2026, गुरुवार: सकाळी 5.52 ते सायंकाळी 5.47
डिसेंबर 2026 मधील विवाहासाठी शुभ तारखा
2 डिसेंबर 2026 बुधवार
3 डिसेंबर 2026 गुरुवार
4 डिसेंबर 2026 शुक्रवार
5 डिसेंबर 2026 शनिवार
6 डिसेंबर 2026 रविवार
11 डिसेंबर 2026 शुक्रवार
12 डिसेंबर 2026 शनिवार
लग्नासाठी मुहूर्त पाहणे का महत्त्वाचे असते?
लग्न म्हणजे दोन जिवांचा संगम, नव्या प्रवासाला सुरुवात. त्यामुळे दोघांचे वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी ग्रहांची अनुकूलता, सकारात्मक सुरुवात महत्त्वाची असते. पंचांगामध्ये तिथी, नक्षत्र, वार, योग तसेच ग्रहांची योग्यस्थिती पाहून हा मुहूर्त ठरवला जातो.लग्नामध्ये केले जाणारे विधी म्हणजेच मंगलाष्टके तसेच इतर धार्मिक कार्ये ठरलेल्या वेळेत नीट पार पडण्यासाठी मुहूर्त पाहणे महत्त्वाचे असते.
आज तुळशीचे लग्न
दुसरीकडे आजपासून तुळशी विवाहाचे मुहूर्तही सुरु होत आहे पंचांगानुसार, यंदा तुळशी विवाह शनिवार, 21 नोव्हेंबर 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. कार्तिक शुक्ल द्वादशी तिथीला हा विवाह सोहळा पार पडणार आहे मात्र लोक परंपरेनुसार कार्तिकी एकादशीनुसार त्रिपुरारी पोर्णिमेपर्यंत 20-24 नोव्हेंबर या कालावधीत कोणत्याही दिवशी तुळशीचे लग्न लावणे शुभ ठरेल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)