चिंता नको..! लहान मुलांना घरच्या घरी बनवून द्या केमिकलविरहीत मॉडलिंग क्ले

सध्या मुलांमध्ये क्ले वापरून विविध वस्तू आणि आकार बनवण्याची क्रेझ आहे. लहान मुलांना क्लेसोबत खेळायला आवडतं. पण मार्केटमध्ये मिळणाऱ्या क्लेमध्ये सिंथेटिक कलर आणि केमिकल असतं. त्यामुळे मुलांची चिंता वाटते. पण तुम्ही घरच्या घरी क्ले बनवून देऊ शकता. कसं ते जाणून घ्या.

चिंता नको..! लहान मुलांना घरच्या घरी बनवून द्या केमिकलविरहीत मॉडलिंग क्ले
चिंता नको..! लहान मुलांना घरच्या घरी बनवून द्या केमिकलविरहीत मॉडलिंग क्ले
Image Credit source: Freepik
| Updated on: Jun 08, 2026 | 4:49 PM

लहान मुलांमध्ये क्लेबाबत प्रचंड आकर्षण आहे. कारण त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे आकार देऊन वस्तू बनवता येतात. त्यामुळे दुकानात गेलं की क्लेची मागणी आपसूक होते. तुम्ही पालक असाल तर तुम्हाला हा अनुभव आला असेल. पण त्यात वापरले जाणारे सिंथेटिक रंग आरोग्यासाठी घातक असतात. त्यात तोंडात वगैरे बोटं घातली तर अपाय होऊ शकतो. यासाठी तुम्ही घरच्या घरी काही नैसर्गिक वस्तू वापरून क्ले बनवून देऊ शकता. मार्केटमधील क्लेसारखंच असल्याने मुलांना त्यात नवीन असं काही वाटणार नाही. तसेच तुमची चिंताही मिटेल. मॉडलिंग क्ले घरच्या घरी बनवणं अगदी सोपं आहे. यासाठी फार काही वेळ लागतो असंही नाही. त्यामुळे पुढच्या वेळेस बाजारात जाऊन मॉडलिंग क्ले घेण्याऐवजी घरच्या घरी क्ले तयार करा.

मॉडलिंग क्लेसाठी काय हवं?

मॉडलिंग क्लेसाठी तुम्हाला काही वस्तूंची आवश्यकता हे. एक कप फेव्हिकोल घ्या. त्यात दोन चमचे वाइट व्हिनेगर टाका, दोन चमचे खोबरेल तेल किंवा इतर तेल टाकलं तरी चालेल. पण तेल शुद्ध असेल तर रंगात बाधा येत नाही. एक कप कॉर्नफ्लोर घ्या. या चार वस्तूच्या माध्यमातून तुम्ही घरच्या घरी मॉडलिंग क्ले तयार करू शकता.

कसं बनवाल मॉडलिंग क्ले?

  • सर्वात आधी नॉनस्टिक पॅन घ्या. ऑमलेट किंवा चपाती बनवण्यासाठी वापरला जाणारा पॅन घेऊ शकता. फक्त इतकंच की तो फार खोलगट नसावा.
  • पॅन गॅसवर ठेव आणि त्यात फेव्हिकोल टाका. त्यानंतर खोबरेल तेल आणि व्हिनेगर टाका.
  • आता या मिश्रणात कॉर्नफ्लोर टाका आणि गॅसची फ्लेम कमी करा. तसेच सर्व वस्तूंचं योग्य पद्धतीने मिश्रण करा. ही कृती सर्व मिश्रण पॅनपासून वेगळं होत नाही तिथपर्यंत करा.

  • जेव्हा मिश्रण पॅन पूर्णपण सोडेल आणि इलास्टिक सारखं खेचलं जाईल. तेव्हा आपल्याला जे हवं आहे ते तयार झालं असं समजा. आता पॅनमधून काढून त्यावर हलकं कॉर्नफ्लोर टाका. पीठ मळतो तसं ते मिश्रण मळून घ्या.

रंगीत क्ले तयार करण्यासाठी

वरील कृती केल्यानंतर तुमचा क्ले तयार झाला असेल. आता तुम्हाला रंगीत क्ले हवा असेल तर तसे रंग मिश्रित करू शकता. त्या मिश्रणाचे काही भाग करा आणि त्यात फूड रंग टाका. त्याचं व्यवस्थित मिश्रण करा. तुम्ही लाल, पिवळा, हिरवा हवा तो क्ले करू शकता. आता हा क्ले मुलांना खेळण्यासाठी तयार असेल.

या गोष्टी लक्षात ठेवा

  • तुम्ही क्ले सुगंधित करण्यासाठी त्यात एसेंस टाकून मिश्रण करू शकता.
  • क्ले मळण्यासाठी तुम्ही कॉर्नफ्लोरच्या जागी वॅसलीन किंवा बेबी ऑईल घेऊ शकता. त्यामुळे ते चिकटत नाही.
  • क्ले हलका ओला असलेल्या कपड्यात गुंडाळून ठेवा. कारण क्ले वेगाने सुकून जातो.
  • क्ले टिकवण्यासाठी तो एअर टाइट कंटेनर किंवा जिपर बॅगमध्ये ठेवू शकता. त्यानंतर फ्रिजमध्ये ठेवा.
  • जर क्ले थोडा सुकला असं वाटत असेल तर त्यावर थोडं पाणी टाकून मळून पुन्हा वापरू शकता.
Follow Us