कोंडा दूर करण्यासाठी, नैसर्गिकरित्या केस गळणे थांबवण्यासाठी तेलात ‘या’ गोष्टी करा मिक्स

केस गळण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे कोंडा. अनेक शँम्पू आणि अन्य गोष्टींचा वापर करूनही कोंडयाची समस्या जात नाही. तर तेलात या गोष्टी मिक्स करून लावल्याने कोंडा दूर होईल आणि केस गळणे कमी होईल.

कोंडा दूर करण्यासाठी, नैसर्गिकरित्या केस गळणे थांबवण्यासाठी तेलात या गोष्टी करा मिक्स
dandruff
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Oct 27, 2025 | 12:42 PM

मुले असोत किंवा मुली आजकाल प्रत्येकाला केस गळण्याच्या व केसांमध्ये कोंडा होण्याच्या समस्या सतावत असते. अशातच हिवाळा सुरू होताच, कोंड्याची समस्या अधिकच वाढते, ज्यामुळे केस जास्त प्रमाणात गळू लागतात. तसेच कोंडा झाल्याने स्कॅल्पमध्ये खाज सुटते. अशातच अनेकजण यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय करत असतात. कोणत्याही शँम्पू आणि अन्य गोष्टींचा वापर करूनही कोंडा काही कमी होत नाही. अशावेळेस काही नैसर्गिक गोष्टी केसांना लावल्याने केवळ कोंडा दूर करू शकत नाहीत तर केस गळणे कमी करण्यास देखील मदत करू शकतात. या लेखात, आपण अशा पाच घटकांबद्दल जाणून घेऊ जे तुम्ही तेलात मिक्स करून लावू शकता. यामुळे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही, तुमचे केस जाड आणि मजबूत होतील आणि कोंड्याच्या समस्येपासूनही आराम मिळेल.

जास्त कोंडा तुमचे केस कमकुवत करतात ज्यामुळे केस तुटू शकतात. तुमचा दैनंदिन आहार सुधारण्यासोबतच, केसांची योग्य काळजी घेतल्याने तुम्हाला केसांच्या समस्यांवर मात करण्यास मदत होऊ शकते.

लिंबाचा रस

लिंबाचा रस तेलात मिक्स करून स्कॅल्पला लावल्याने कोंडा दूर होतो आणि खाज सुटत नाही. यामुळे केस चमकदार होतात, परंतु जास्त लिंबाचा रस मिक्स करू नका आणि जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर हा उपाय करने टाळा.

जटामांसी (स्पाइकनार्ड) रस

स्पाइकनार्ड म्हणजेच जटामांसी आयुर्वेदिक वनस्पती आहे जी केसांसाठी एक उत्तम औषध आहे. तर ही वनस्पती हिमालयात अधिक आढळून येते आणि ही एक सुंगधीत औषध वनस्पती आहे. तुम्ही स्पाइकनार्ड नारळाच्या तेलात भिजवू शकता आणि हे तेल तुमच्या स्कॅल्पपासून केसांच्या टोकापर्यंत लावू शकता. यामुळे केस मजबूत होतात आणि केस गळणे कमी होते.

आवळा पावडर

तुम्ही जेव्हा केसांना तेल लावता तेव्हा तेलात आवळा पावडर मिक्स करून लावू शकता. यामुळे केस काळे आणि जाड होण्यास मदत होते, कोंडा कमी होतो आणि केसांची वाढ वाढते.

कढीपत्ता

हेअर ऑईलमध्ये कढीपत्त्याची पाने मिक्स करून लावल्याने कोंडा कमी होतो आणि केस गळणे आणि स्कॅल्पची जळजळ थांबण्यास मदत होते. यासाठी गॅसवर एका भाड्यात पाणी टाका आणि त्यावर आणखीन एक भांड ठेवा त्यात केसांना लावायचे तेल आणि या तेलात कढीपत्त्याची पाने टाकून उकळवा. आता हे तेल कोमट झाल्यावर केसांना लावून ठेवा व थोड्यावेळात शॅम्पू करा.

कोरफड जेल

कोरफड जेल कोरडा कोंडा कमी करण्यापासून ते केसांना मऊ आणि चमकदार बनवण्यापर्यंत आश्चर्यकारकपणे काम करते. तुम्ही कोरफड जेल नारळाच्या तेलात मिक्स करून लावू शकता. प्रत्येक शॅम्पू करण्यापूर्वी किमान एक तास आधी कोरफड आणि नारळाच्या तेलाचे मिश्रण लावा. तुम्हाला पहिल्यांदाच उत्कृष्ट परिणाम दिसतील.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)