AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चहासोबत कधीही खाऊ नका ‘या’ गोष्टी; अन्यथा तुमच्या आरोग्यावर होतील वाईट परिणाम!

भारतात चहा पिण्याचा ट्रेंड खूप जास्त आहे. लोक सकाळी उठल्याबरोबर चहा पिल्यावरच दिवसाची सुरूवात करतात. अनेक वेळा लोकांना चहासोबत काहीतरी खायला आवडतं, पण चहासोबत खाण्याच्या काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. जाणून घ्या, कोणत्या गोष्टी चहा सोबत वर्ज्य कराव्यात ते.

चहासोबत कधीही खाऊ नका ‘या’ गोष्टी; अन्यथा तुमच्या आरोग्यावर होतील वाईट परिणाम!
vanita kamble
vanita kamble | Updated on: Jul 11, 2022 | 5:01 PM
Share

जगभरात दिवसाची सुरूवात गरमागरम, फक्कड चहाच्या घोट घेऊन होते. चहा प्यायल्यानंतर शरीराला ऊर्जा (Energy to the body) मिळते आणि ताजेतवाने वाटू लागते. सकाळ, दुपार, संध्याकाळ, प्रत्येक कप चहा तुम्हाला ऊर्जा देतो. दुधाच्या चहा व्यतिरिक्त, अनेक प्रकारच्या चहाचे सेवन लोक करतात. ग्रीन टी आणि ब्लॅक टी पासून कॅमोमाइल आणि हिबिस्कस टी (Hibiscus Tea)पर्यंत, चहाचे अनेक प्रकार आहेत. काहींना चहासोबत बिस्किटे खायला आवडतात तर काहींना डंपलिंग्ज इत्यादी. सकाळ चा चहा असो वा दुपारचा अनेकांना चहासोबत काहीतरी खायला आवडतं, पण चहासोबत खाण्याच्या काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या चहासोबत कधीही खाऊ नयेत. असे केल्यास आरोग्यास ते घातक (It is dangerous to health) होऊ शकते. जाणून घेऊया त्या गोष्टी आहेत, ज्या चहासोबत कधीही खाऊ नयेत.

1. सुका मेवा (Nuts)

दुधासोबत लोहयुक्त पदार्थ खाणे टाळावे. सुका मेव्यात भरपूर लोहाचे प्रमाण असते, त्यामुळे चहासोबत सुका मेव्याचे सेवन केल्यास आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे चहासोबत नटस्‌ अर्थात सुकामेवा खाणे टाळा.

2. लोहयुक्त भाज्या(Iron-rich veggies)

लोहयुक्त पदार्थ चहासोबत खाऊ नयेत. कारण चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सलेट असतात जे लोहयुक्त पदार्थ शोषून घेण्यापासून प्रतिबंधित करतात. त्यामुळे सुका मेवा, हिरव्या पालेभाज्या, तृणधान्ये, कडधान्ये, कडधान्ये असे लोहयुक्त पदार्थ चहासोबत टाळावेत.

3. लिंबू(Lemon)

फिटनेस साठी, वजन नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत लिंबू घालून चहा पिण्याची शिफारस केली जाते. कारण काही लोकांचा असा विश्वास आहे की, यामुळे जलद गतीने वजन कमी होते. परंतु त्या लोकांना हे देखील माहित असले पाहिजे की चहामध्ये लिंबाचा रस मिसळून ते ऍसिडिक बनते आणि शरीरात जळजळ होऊ शकते. सकाळी रिकाम्या पोटी लिंबू चहा पिल्यास, अॅसिड रिफ्लक्स आणि छातीत जळजळ सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. त्यामुळे हा चहा पूर्णपणे टाळणे चांगले.

4. बेसन(Gram flour)

भजी किंवा बेसना पासुन तयार खाद्यपदार्था सोबत चहा पिणे भारतात सामान्य बाब आहे. आपल्यापैकी बहुतेकजण असे करतात. तज्ज्ञांचे मत आहे की, चहासोबत बेसनाचे पदार्थ खाल्ल्याने पचन तंत्रावर ताण येतो त्यामुळे शरीराची पोषक तत्वे शोषून घेण्याची क्षमताही कमी होते. परिणामी बेसनापासून बनवलेल्या वस्तूंचे चहासोबत कधीही सेवन करू नका.

5. हळद (Turmaric)

चहा पिताना हळद असलेले पदार्थ टाळावेत कारण त्यामुळे पोटात गॅस, अॅसिडीटी किंवा बद्धकोष्ठता यासारख्या समस्याही होऊ शकतात. हळद आणि चहाची पाने एकमेकांशी सुसंगत नाहीत, म्हणून चहासोबत हळद असलेल्या पदार्थांचे सेवन करू नका.

6. थंड पदार्थ (Cold foods)

गरम चहासोबत किंवा चहानंतर लगेच थंड पदार्थ कधीही खाऊ नका. काहींना चहा संपल्या-संपल्या पाणी पिण्याची सवय असते. मात्र, असे केल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. याचे कारण असे की वेगवेगळ्या तापमानाचे पदार्थ एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया कमकुवत होऊन मळमळ होऊ शकते. गरम चहा प्यायल्यानंतर, किमान 30 मिनिटे थंड काहीही खाणे टाळावे.

Follow Us
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल