New Year 2021 Resolution | नव्या वर्षात मनःशांती-आरोग्य-आनंद मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ फिटनेस टिप्स!

| Updated on: Dec 31, 2020 | 4:16 PM

2020ने आपल्याला बर्‍याच गोष्टी शिकवल्या आहेत. पण यातही सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरली आरोग्याविषयी जागरूकता!

New Year 2021 Resolution | नव्या वर्षात मनःशांती-आरोग्य-आनंद मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ फिटनेस टिप्स!
Follow us on

मुंबई : नवीन वर्षाला आता अवघे काही तास शिल्लक उरले आहेत. सरत्या वर्षाला अच्छा म्हणून आपण नव्या वर्षात एक नवी सुरुवात करण्याचा निर्णय आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी घेतला असेल. दरवर्षी आपण नव्या वर्षाच्या स्वागतासोबतच एखादा नवा संकल्प कतो. काही लोक हा संकल्प पूर्ण करतात. तर, काही लोक मात्र चार दिवसांनी आपला संकल्प विसरून जातात. मात्र, यंदा कोरोनाची परिस्थिती पाहता सगळ्यांनाच निरोगी जीवनाचे महत्त्व पटले आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांनी नव्या वर्षात स्वतःच्या शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष देण्याचा संकल्प सोडला आहे. तुम्ही देखील असाच संकल्प केला असेल, तर ‘या’ काही टिप्स नक्कीच तुमच्या कामी येतील (New year 2021 resolution tips for maintain healthy lifestyle).

2020ने आपल्याला बर्‍याच गोष्टी शिकवल्या आहेत. पण यातही सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरली आरोग्याविषयी जागरूकता! कोरोना महामारीच्या काळात आरोग्य ही सगळ्यात मोठी चिंता आहे. देशच नव्हे तर, संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. यामुळेच येत्या नवीन वर्षात स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी फिटनेसकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनशैलीत काही बदल करावे लागतील. चला तर त्या बदलांविषयी जाणून घेऊया…

लवकर उठा आणि चालण्याचा व्यायाम करा.

रोज सकाळी लवकर उठून किमान 15 मिनिटे चालण्यासाठी जा. किमान 15 मिनिट चालणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे. दररोज चालण्याचा व्यायाम करून तुम्ही मधुमेह, हृदयरोगासारख्या आजारांना टाळू शकता (New year 2021 resolution tips for maintain healthy lifestyle).

व्यायाम करा.

याआधी बहुतेक लोकांना असे वाटायचे की, व्यायाम केवळ खुल्या मैदानात किंवा जिममध्येच केला जाऊ शकतो. परंतु, कोरोनामुळे आता या गोष्टी बदलल्या आहेत. आता आपण घरच्या घरी व्यायाम आणि योगा करू शकता. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आपण घरीच पुशअप्स, चेस्ट फ्लाय, स्क्वॉट्स करू शकता. याशिवाय स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण योगासने देखील करू शकता.

भरपूर पाणी प्या.

पाणी पिणे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे दररोज किमान 4 ते 5 लिटर पाणी प्या. पाणी पिण्यामुळे तुमचे शरीर डीटॉक्स होते आणि डिहायड्रेट होत नाही. तसेच, शरीर ऊर्जा मिळते.

पुरेशी झोप घ्या.

चांगल्या आरोग्यासाठी दररोज किमान 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक असते. सकाळी लवकर उठणे आणि नियमित व्यायाम केल्याने आपल्याला चांगली झोप यायला मदत होईल. जेव्हा झोप पूर्ण होत नाही, तेव्हा डोकेदुखी आणि थकवा यासारख्या समस्या निर्माण होतात. शिवाय कामात लक्ष लागत नाही आणि चिडचिड होते.

(New year 2021 resolution tips for maintain healthy lifestyle)

हेही वाचा :