
अंकशास्त्रावरून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, त्याचे व्यक्तिमत्व, कौशल्य, अशा अनेक गोष्टी मुलांकच्या आधारावर माहिती करून घेता येत असतात. व्यक्तीच्या जन्मतारखेवरून हा मुलांक काढला जातो. प्रत्येक मुलांकाचे वेगवेगळे वैशिष्ट्य असतात. एखाद्याचा मुलांक सारखा असला तरी यात स्त्रिया आणि पुरुषांची वेगळीवेगळी व्यक्तिमत्व आणि गुण बघायला मिळू शकतात. अंकशास्त्रानुसार एका मुलांकाच्या महिला या पैशांची बचत करण्यात हुशार असतात या महिलांना वायफळ खर्च करायला आवडत नाही. या मुलांकच्या महिला या केवळ आपल्या शब्दांनीच समोरच्या व्यक्तीचं मन जिंकतात.
कोणता आहे तो मुलांक..
जर एखाद्या महिलेचा जन्म महिन्याच्या 5, 14 किंवा 23 (2+3=5) तारखेला झाला असेल तर तिचा मूलांक 5 मानला जातो. या मुलांकाच्या महिला त्यांच्या बुद्धिमत्ता, उत्साही स्वभाव आणि संवाद कौशल्यासाठी ओळखल्या जातात. 5 या मुलांकाचा स्वामी ग्रह बुध आहे. त्यामुळे बुध ग्रह या मुलांकाच्या बोलण्यात गोडवा, हुशारी आणि शहाणपण प्रदान करतो. अशा महिला आपल्या बोलण्याने सर्वांचे मन जिंकण्यात माहिर असतात. तसंच त्यांचा आत्मविश्वास पाहण्यासारखा असतो. या महिलांना कोणाच्याही बोलण्याने लवकर वाईट वाटत नाही आणि त्या प्रत्येक परिस्थितीत स्वतःला उत्तम प्रकारे सांभाळतात.
मुलांक 5च्या महिलांची वैशिष्ट्य
मुलांक 5 च्या महिलांना चित्रकला, नृत्य, गायन आणि संगीतात खूप रस असतो. त्या चपळ आणि विनोदी असतात, त्यामुळे त्यांच्या सभोवतालचे वातावरण नेहमीच आनंदी राहते. प्रत्येक कामात या महिला प्रथम विचार करतात आणि नंतर निर्णय घेतात, त्यामुळे सहसा कोणी त्यांची फसवणूक करू शकत नाही. 5 मुलांक असलेल्या महिला गणित आणि अकाउंटिंगमध्ये खूप चांगल्या असतात. त्यांची तर्कशक्ती खूप प्रबळ असते. कोणीही त्यांच्याशी सहजपणे वादात जिंकू शकत नाही. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, या महिला लवकरच कोणत्या ना कोणत्या नोकरीत किंवा व्यवसायात गुंततात.
अनावश्यक खर्च करायला आवडत नाही..
या महिला अनावश्यक खर्च टाळतात आणि बचत करून चांगली संपत्ती जमा करतात. विशेष म्हणजे मुलांक 5च्या महिला कधीही आपली संपत्ती दाखवत नाही. या महिला व्यवसाय क्षेत्रात खूप यशस्वी होतात. करिअरबद्दल बोलायचे झाले तर, 5 मुलांक असलेल्या महिला कम्युनिकेशन, मीडिया, ट्रॅव्हल, मार्केटिंग, शिक्षण आणि सर्जनशील क्षेत्रात उत्तम कामगिरी करतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)