AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fitness Tips | वजन कमी करायचंय? ‘हा’ डाएट प्लॅन फॉलो करा नि लठ्ठपणापासून सुटका मिळवा!

वजन कमी करण्यासाठी सुमारे 60 ते 70 टक्के वाटा हा योग्य आहाराचा असतो, तर उर्वरित 30 ते 40 टक्के वाटा हा व्यायामाचा असतो.

Fitness Tips | वजन कमी करायचंय? ‘हा’ डाएट प्लॅन फॉलो करा नि लठ्ठपणापासून सुटका मिळवा!
आहारात या सहा भाज्यांचा अवश्य समावेश करा; आरोग्यासाठी लाभदायी ठरू शकते
| Updated on: Dec 23, 2020 | 5:44 PM
Share

मुंबई : वजन कमी करण्यासाठी सुमारे 60 ते 70 टक्के वाटा हा योग्य आहाराचा असतो, तर उर्वरित 30 ते 40 टक्के वाटा हा व्यायामाचा असतो. म्हणजेच तंदुरुस्त राहण्यासाठी आहार आणि व्यायाम या दोन्हीचे संयोजन आवश्यक आहे. परंतु, आजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे स्वत:साठी वेळ मिळवणे खूप अवघड बनले आहे. विशेषतः नोकरी करणार्‍या लोकांना बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागतो. दिवसभर लॅपटॉप आणि मोबाईलवर काम करण्यात वेळ निघून जातो. यानंतर, इतका कंटाळा येतो की त्यांना दुसरे काहीही करावेसे वाटत नाही (Perfect Diet Plan For Weight Loss).

अशावेळी त्यांना ना जेवणासाठी वेळ असतो ना व्यायामासाठी. अशा परिस्थितीत वजन वाढते आणि सर्व आजार अगदी लहान वयातच आपल्याभोवती फिरू लागतात. जर आपणही अशाच काही परिस्थितीला सामोरे जात असाल, तर एक परिपूर्ण आहार योजना बनवणे गरजेचे आहे. या आहार योजनेचे अर्थात डाएट प्लॅनचे अनुसरण करून तुम्ही तुमचे वजन सहज कमी करू शकता.

आदर्श आहार योजना अर्थात डाएट प्लॅन

  1. आपल्या सुंदर दिवसाची सुरुवात कोमट पाणी पिऊन करा. यानंतर ब्रेकफास्टमध्ये दूध, ग्रीन टी किंवा चहा घ्या. परंतु, केवळ चहा न पिता त्यासोबत उपमा, ओट्स, व्हेजिटेबल दलिया, ब्राऊन ब्रेड, ब्राऊन ब्रेडने बनवलेले व्हेजिटेबल सँडविच, मुगडाळ डोसा असा एखादा पौष्टिक पदार्थ खा.
  2. सकाळचा नाश्ता ते दुपारच्या जेवणादरम्यान फळं, नारळाचे पाणी, रस, ताक असे काहीतरी सेवन करा.
  3. दुपारच्या जेवणात प्रथम सलाड खा. त्यानंतर डाळ, 2 विनातेल चपात्या आणि हिरव्या भाज्या खा. चपाती बार्ली, हरभरा आणि गव्हाचे पीठ यांच्या मिश्रणाची असावी. चपातीसाठी मका, गहू, बाजरी हे त्या-त्या हंगामाप्रमाणे बदला.
  4. दुपारच्या जेवणानंतर चहा किंवा ग्रीन टी सोबत संध्याकाळच्या नाश्त्यात भाजलेले चणे, ढोकळा, डोसा यापैकी एखादा पदार्थ खा.
  5. रात्रीचे जेवण हलके असावे. त्यात हिरव्या भाज्या आणि चपाती यांचा समावेश करा. ओल्या भाज्या आणि हिरव्या पालेभाज्या घ्या, पण रात्रीच्या जेवणात केवळ एकच चपाती खा. किंवा याला पर्याय म्हणून आपण व्हेजिटेबल दलिया, व्हेजिटेबल ओट्स, कच्चा पनीर इत्यादी पदार्थ देखील खाऊ शकता (Perfect Diet Plan For Weight Loss).

‘हे’ देखील लक्षात ठेवा!

या आहारासोबतच दररोज शारीरिक व्यायाम करणे देखील महत्त्वाचे आहे. कोणत्याही प्रकारे, व्यायामासाठी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून कमीतकमी अर्धा तास जरूर काढा. जर आपण व्यायाम करू शकत नसाल तर केवळ चाला. जेणेकरून संपूर्ण शरीर योग्य प्रकारे कार्य करेल. याशिवाय रिच फूड, जंक फूड आणि फास्ट फूड, शुगर ड्रिंक इत्यादी गोष्टी पूर्णपणे टाळा. जर, आपण कधीकधी हे पदार्थ खात असाल तर, दुसर्‍या दिवशी हलके अन्न खा किंवा पूर्णपणे लंघन करा, जेणेकरून शरीरात गेलेल्या अतिरिक्त कॅलरी बर्न करता येतील.

(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

(Perfect Diet Plan For Weight Loss)

हेही वाचा : 

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.