
दादरच्या कबुतरखाना हटवण्यावून जैन समाज आक्रमक झालेला दिसत आहे. जैन धर्मात कबुतरांना फार महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. तसेच काहीजणांना ती सवयही असते की कबुतरांसाठी धान्य खायल टाकायला जाणे. पण खरं पाहायला गेलं तर कबुतरांमुळे अनेक आजार पसरतात असं म्हटलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे कबुतरांच्या संपर्कात राहणे म्हणजे स्वतःसाठी तसेच परिसरातील इतर लोकांसाठीही आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण करणे.
हा आजार जो कधीकधी प्राणघातक ठरू शकतो
याचाचं एक उदाहरण म्हणजे दिल्लीतील एका 11 वर्षाच्या मुलाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीच्या तपासणीत डॉक्टरांना आढळले की त्या मुलाच्या फुफ्फुसात जळजळ आहे. त्यानंतर त्या मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये असे आढळून आले की त्या मुलाला हायपरसेंसिटिव्हिटी न्यूमोनिटिस नावाचा एक दुर्मिळ फुफ्फुसाचा आजार झाला आहे. हा एक प्रकारचा न्यूमोनिया आजार आहे, जो कधीकधी प्राणघातक ठरू शकतो. डॉक्टरांना तपासणीत असे आढळून आले की फुफ्फुसांची ही गंभीर ऍलर्जीची समस्या मुलगा कबुतरांच्या विष्ठा आणि पंखांच्या संपर्कात बराच काळ राहिल्यामुळे झाली आहे.
हायपरसेंसिटिव्हिटी न्यूमोनिटिस म्हणजे काय?
कबुतरांमुळे होणारा हा आजार दरवर्षी कबुतरांच्या संख्येसह वाढत आहे. संशोधनानुसार, एक कबुतर वर्षाला 11.5 किलो शौच करतो. कबुतरांच्या शौचांशी संबंधित आजारांमध्ये क्रिप्टोकोकोसिस, हिस्टोप्लाज्मोसिस आणि सायटाकोसिस यांचा समावेश आहे. शौच साफ करताना निर्माण होणाऱ्या धुळीत श्वास घेतल्याने तुम्हाला या आजारांची लागण होऊ शकते. हायपरसेंसिटिव्हिटी न्यूमोनिटिस हा एक अतिशय धोकादायक आजार आहे. जर तो तीव्र झाला तर त्यामुळे श्वास घेण्यास त्रास, खोकला, ऑक्सिजनची पातळी कमी होणे आणि सांधेदुखी होऊ शकते.
हायपरसेंसिटिव्हिटी न्यूमोनिटिसचा धोका कोणाला जास्त असतो?
कबुतर आणि इतर पक्ष्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना हा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. हायपरसेंसिटिव्हिटी न्यूमोनिटिस पक्ष्यांच्या विष्ठा, मूत्र आणि त्यांनी सोडलेल्या अन्नाच्या कणांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना देखील होतो.
त्वचारोग
कबुतरांमुळे फक्त फुफ्फुसाचाच आजार नाही तर त्वचारोग देखील होऊ शकतो. कबुतरांच्या पिसांमुळे किंवा त्यांच्या पिसांमध्ये असणाऱ्या छोट्यामोठ्या किटकांमुळे त्वचारोग देखील होऊ शकतो. त्यामुळे कबुतरांना खायला देणे हे जरी एक चांगली सवय असली तरी देखील त्यामुळे आपल्या आरोग्याला होणारा धोका देखील होऊ शकतो ही बाब लक्षात घेतली पाहिजे.