AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅन्सरची सामान्य लक्षणे जी लोक सहसा दुर्लक्ष करतात, जाणून घ्या अन्यथा परिणाम गंभीर होऊ शकतात

कॅन्सर अनेक घटकांवर अवलंबून असतो.पण बऱ्याचदा लोक कॅन्सरबाबतची सामान्य लक्षणे लक्षात घेत नाही. आणि त्याचे गंभीर परिणाम पाहायला मिळतात. पण जर तिचं लक्षणे लवकर लक्षात आली तर कदाचित त्यावर उपचार करणे सोपे जाते.

कॅन्सरची सामान्य लक्षणे जी लोक सहसा दुर्लक्ष करतात, जाणून घ्या अन्यथा परिणाम गंभीर होऊ शकतात
Ignoring Cancer Symptoms, Early Signs & PreventionImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 05, 2025 | 6:00 PM
Share

कॅन्सर अनेक घटकांवर अवलंबून असतो. त्याचे एक मुख्य कारण अनुवंशशास्त्र आहे आणि दुसरं म्हणजे लाईफस्टाईल. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात कॅन्सरचे अनेक घटक असतात. जे अनुवांशिक कारणांमुळे आणि जीवनशैलीमुळे प्रभावित होतात. कॅन्सरबाबत गंभीर लक्षणे तर फार नंतर जाणवतात पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. पण कॅन्सरची काही लक्षणे देखील असतात ज्याकडे सर्वजन दुर्लक्ष करतात कारण ती सामान्य वाटतात. पण हीच चूक नंतर महागात पडू शकते. कॅन्सरची सुरुवातीला कोणती लक्षणे उद्भवतात याबद्दल तज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं आहे हे जाणून घेऊयात.

कॅन्सर शरीरात कुठेही होऊ शकतो. बऱ्याचदा कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे सामान्य मानली जातात

कॅन्सर शरीरात कुठेही होऊ शकतो. बऱ्याचदा कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे सामान्य मानली जातात आणि दुर्लक्षित केली जातात. तथापि, जर ही लक्षणे सुरुवातीलाच ओळखली गेली आणि उपचार सुरू केले तर कॅन्सरचा विकास आणि वाढ रोखता येणे शक्य आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कॅन्सरवर संपूर्ण उपचार उपलब्ध आहेत. तथापि, निष्काळजीपणा आणि पुरेशा वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे, भारतात कॅन्सर अनेकदा दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात समजून येतो. त्यानंतर कॅन्सरचे उपचार करणे कठीण होते.

कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे

श्री जगन्नाथ धर्मार्थ चॅरिटेबल कॅन्सर हॉस्पिटलचे वरिष्ठ ऑन्कोलॉजिस्ट डॉ. ऋषी गुप्ता म्हणतात की, शरीरातील वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या कॅन्सरची अनेक प्रकारची लक्षणे दिसून येतात. बऱ्याचदा अनेक प्रकारच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे सारखीच असतात. जर तुम्हाला सतत खोकला, अचानक वजन कमी होणे, शरीरात गाठी येणे, त्वचेत बदल होणे, पचनसंस्थेत किंवा मूत्रमार्गात कोणतेही बदल जाणवत असतील तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

कोणती लक्षणे आहेत?

जर तुम्हाला दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला येत असेल किंवा तुमचा आवाज बदलला असेल.

जर तुमचे वजन कोणत्याही प्रयत्नाशिवाय कमी होत असेल.

तसेच तुम्हाला शरीराच्या कोणत्याही भागात गाठ किंवा सूज जाणवत असेल.

विश्रांती घेतल्यानंतरही थकवा जाणवत असेल.

जर तुम्हाला शरीराच्या कोणत्याही भागात कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय वेदना होत असतील.

जर तुम्हाला अन्न गिळण्यास त्रास होत असेल. भूक लागत नसेल.

यापैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील, तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि तपासणी करून घेणं गरजेचं असंत.

लोक त्याच्या सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष करतात.

डॉ. ऋषी गुप्ता स्पष्ट करतात की जेव्हा शरीराच्या कोणत्याही भागात असलेल्या पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात तेव्हा कॅन्सर होतो. याची अनेक कारणे आहेत. जसे की मद्यपान, धूम्रपान, रिफाइंड पीठाचे जास्त सेवन आणि अनेक प्रकरणांमध्ये कॅन्सर अनुवांशिकरित्या देखील होतो. चिंतेची बाब अशी आहे की भारतातील बहुतेक कॅन्सरच्या रुग्णांना शेवटच्या टप्प्यात त्यांचे निदान होते जे अतिशय नुकसानकारक आहे. कारण लोक त्याच्या सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष करतात.

(डिस्क्लेमर : बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)

https://www.tv9hindi.com/health/identify-the-symptoms-that-emerge-early-when-cancer-occurs-3353833.html

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.