संत्र्याच्या सालीपासून तयार करा स्पेशल फेसपॅक, त्वचा होईल चमकदार

| Updated on: Apr 15, 2021 | 7:02 AM

चांगली आणि सुंदर त्वचा कोणाला नको असते. त्वचेला चमकदार बनविण्यासाठी आपण घरी फेसपॅक देखील बनवू शकता.

संत्र्याच्या सालीपासून तयार करा स्पेशल फेसपॅक, त्वचा होईल चमकदार
संत्र्याची साल
Follow us on

मुंबई : चांगली आणि सुंदर त्वचा कोणाला नको असते. त्वचेला चमकदार बनविण्यासाठी आपण घरी फेसपॅक देखील बनवू शकता. विशेष म्हणजे आपण घरच्या घरी संत्र्याच्या सालपासून एक चांगली फेसपॅक तयार करू शकतो. आपण संत्री खाल्ल्यानंतर त्याचे साल फेकून देतो. मात्र, असे न करता त्यापासून आपण फेसपॅक तयार करू शकतो. संत्री हे फळ व्हिटॅमिन सीचा मोठा स्त्रोत आहे. संत्र्याच्या सालमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात, जे तुमची त्वचा सुधारण्यास मदत करतात. (Prepare from orange peel at home Special facepack)

-फेसपॅक तयार करण्यासाठी 1 चमचा संत्र्याच्या पावडर घ्या त्यामध्ये दही व्यवस्थितपणे मिक्स करा. ही पेस्ट साधारण 20 मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा धुवा हि प्रक्रिया आठवड्यातून दोन वेळा केली तर तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होईल.

1 चमचे संत्र्याच्या सालीचा पावडर घ्या त्यामध्ये 1 चमचा हळद आणि 1 चमचे मध घालाव. ही हे पेस्ट चांगली मिक्स करा यानंतर 5 ते 10 मिनिटे चेहऱ्यावर ही पेस्ट लावून ठेवा. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

-त्वचा तेलकट असल्यास एका वाटीमध्ये संत्र्याच्या सालींची पेस्ट आणि चंदन पावडर एकत्र घ्या व फेस पॅक तयार करा. या पॅकमुळे तेलकट त्वचेवरील मुरुमांची समस्या हळूहळू दूर होण्यास मदत मिळू शकते.

-त्वचेवर नैसर्गिक तेज येईल आणि त्वचा सैल देखील पडणार नाही. तसंच मुरुम आणि ब्लॅकहेड्सची समस्या देखील दूर होण्यास मदत मिळू शकते

-संत्रीची साल सुकवून घ्या आणि त्याचे पावडर तयार करा या पावडरमध्ये मध आणि दूध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. थोडया हलक्या हातांनी मसाज करा, कारण फेसमास्कबरोबरच हे चांगले स्क्रब आहे. मसाज केल्यानंतर ते कोरडे होऊ द्या. नंतर कोमट पाण्याने तोंड धुवा. संत्री हे व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानला जातो.

(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)

संबंधित बातम्या : 

(Prepare from orange peel at home Special facepack)