AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

raksha bandhan 2024 : रक्षा बंधनाला लाडक्या बहीण-भावाला पाठवा मराठमोळे संदेश

raksha bandhan 2024 wishes marathi message: रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या भावाला काही खास गोष्टी सांगितल्याने हा सण आणखी अविस्मरणीय होऊ शकतो. बहीण भावाच्या या नात्याचा आनंद अधिक द्विगुणीत करणारे मराठमोळे संदेश...

raksha bandhan 2024 : रक्षा बंधनाला लाडक्या बहीण-भावाला पाठवा मराठमोळे संदेश
Rakhi 2024
| Updated on: Aug 18, 2024 | 9:07 AM
Share

raksha bandhan 2024 wishes marathi message: बहीण-भावाच्या नात्याचे प्रतीक असलेले रक्षाबंधन श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पोर्णिमेला साजरा केला जातो. यंदा 19 ऑगस्ट 2024 रोजी रक्षाबंधन येत आहे. भाऊ-बहिण हे एकमेकांचे पहिले मित्र असतात. ते एकमेकांशी कितीही भांडत असले तरी वेळ आल्यावर एकमेकांसाठी जगाशी लढायला तयार असतात. भाऊ-बहिणींमधला बालपणाचा स्नेह मोठा झाल्यावर काहीसा मर्यादित होतो. एकमेकांना अनेक गोष्टी सांगताना ते संकोच वाटतात.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या भावाला काही खास गोष्टी सांगितल्याने हा सण आणखी अविस्मरणीय होऊ शकतो. देशभरात रक्षाबंधन उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो.  बहीण भावाच्या या नात्याचा आनंद अधिक द्विगुणीत करणारे मराठमोळे संदेश…

आठवणींच्या हिंदोळ्यात तू कायम असते,

तू दूर असलीस तरी जवळ भासते

कितीही बिझी असलो तरी

आजचा दिवस खास तुझ्यासाठीच असतो

लाडकी ताई तुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

…………………………………………………..

राखी बंधन हे प्रेम, विश्वास, जबाबदारीचे

बहीण भावाच्या पवित्र नात्याचे,

सदैव बहीण भावाची साथ सोबत राहू दे

हॅप्पी रक्षाबंधन भाई

……………………………………………………….

आठवण रक्षाबंधनाची

तुझ्या मनात सदैव राहो.

भावा-बहिणीच्या नात्यातील गोडी,

अशीच आयुष्यभर राहो.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

…………………………………………………..

लहान असो की मोठी

बहीण असते आयुष्यातील सुख

ज्याच्या नशिबी हे सुख

त्यालाच कळते खूप

………………………………………

लहानपणी तुझ्या कितीतरी चुकांचा फटका मी खाल्ला आहे

कारण तुझ्या रक्षणाचा विडा मी उचलला आहे

………………………………………

रक्षाबंधनाचा सण आला

बहीण-भावाच्या आठवणी जाग्या झाल्या,

एका राखीत सर्व काही सामावले

ताई-दादाचे प्रेम जगावेगळे

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

………………………………………………….

ताई तू माझी… लहान भाऊ मी तुझा…

कायम तूच केलीस माझी रक्षा…

आता मला उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा

रक्षाबंधनाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा

…………………………………………………

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,

घेऊन आला हा श्रावण,

लाख लाख शुभेच्छा तुला

आज आहे बहीण-भावाचा पवित्र सण

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.